Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज “स्वच्छ भारत मिशन” च्या तिसऱ्या वार्षिक कार्यक्रमात तसेच “स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्याच्या सांगता कार्यक्रमात संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ भारत मिशन च्या तिसऱ्या वार्षिक कार्यक्रमात तसेच “स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्याच्या सांगता कार्यक्रमात संबोधन केले.

पंतप्रधान म्हणाले की, २ ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या प्रसंगी आपण ‘स्वच्छ भारत’ च्या उद्दिष्टाकडे किती वाटचाल केली याची पाहणी करता येते.

त्यांनी तीन वर्षांपूर्वी बऱ्याच टीका होत असतांना सुद्धा,” स्वच्छ भारत चळवळीला ” कशी सुरवात केली याची आठवण करून दिली. ते म्हणाले कि,” मी लोकांना महात्मा गांधीजींनी जो स्वच्छतेचा मार्ग दाखविला तो कसा बरोबर होता हे समजावून दिले. अनेक आव्हाने असतांना सुद्धा कुठलीही लाज ना बाळगता काम करत राहणे महत्वाचे,” असेही पंतप्रधान म्हणाले

” आज लोक एका आवाजात स्वच्छतेची इच्छा व्यक्त करतात.” स्वच्छता राखण्या साठी ” केवळ सरकार आणि नेत्यांचे प्रयत्न पुरेसे नाही तर समाजाचा सहभाग असेल तर स्वछता ठेवता येऊ शकते असे पंतप्रधान मोदी म्हणाले “. जनभागीदारीचे विशेष महत्व असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, स्वच्छता अभियान आज सामाजिक चळवळ झाली असून जे काय आत्तापर्यंत या अभियानाद्वारे मिळवले ते भारतीय जनतेच्या “स्वच्छता घर” या कल्पनेशी संबंधित आहे.

जर सत्याग्रहीद्वारे , ‘स्वराज’ मिळवू शकतो तर “श्रेष्ठ भारत सुद्धा सत्याग्रहीं द्वारेच मिळवता येईल. , असेही पंतप्रधानांनी सांगितले

शहरांना स्वच्छतेचा दर्जा देण्या संबंधात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, यासाठी सकारात्मक, स्पर्धात्मक वातावरण आम्ही तयार करणार आहोत. स्वच्छतेला संकल्पनांची क्रांती आवश्यक आहे तर स्वच्छता या संकल्पनेवर आधारित स्पर्धा हि या क्रांतीसाठी व्यासपीठ मिळवून देते.

” स्वच्छता हि सेवा” या पंधरवड्यात आपले योगदान देणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि अजून बरेच प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी स्वच्छता या विषयावर आधारित राष्ट्रीय निबंध, पेंटिंग आणि चित्रपट स्पर्धेचं विजेत्यांना पुरस्कार वितरण केले. त्यांनी डीजिटल प्रदर्शनालाही भेट दिली.

बी. गोखले