Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी साधला संवाद.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडन यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला.  

लोकशाही, कायद्याचे राज्य आणि लोकांशी मजबूत संबंध या सामायिक मूल्यांवर आधारित असलेल्या भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीबद्दल बायडन यांच्या दृढ वचनबद्धतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत-अमेरिका भागीदारी दोन्ही देशांमधील लोकांच्या तसेच संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी आहे, ही बाब अधोरेखित केली.

अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी तपशीलवार विचार विनिमय केला.

युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करताना पंतप्रधानांनी आपल्या नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीची माहिती बायडन यांना दिली.  पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला तसेच शांतता आणि स्थिरता लवकर परत येण्यासाठी पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

बांगलादेशातील परिस्थितीवर  दोन्ही नेत्यांनी आपली सामायिक चिंता व्यक्त केली.  त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यावर आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची, विशेषतः हिंदूंची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला.

दोन्ही नेत्यांनी क्वाडसह बहुपक्षीय मंचांवर सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

उभय नेत्यांनी नियमित संपर्कात राहण्याचे देखील मान्य केले.

***

JPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai