युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान सुनक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान सुनक यांच्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
युके येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai