Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची केली घोषणा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोफत विजेसाठी  घराच्या छतावरील सौर  योजना पीएम सूर्य घर मोफत वीज योजनासुरू करण्याची घोषणा केली.

पंतप्रधानांनी एक्सया समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’  सुरू करीत आहोत. 75,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या  या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना 300 युनिट्सपर्यंत  मोफत वीज पुरवत 1 कोटी घरांना   प्रकाशमान करण्‍याचे आहे. “

 

या योजनेच्या अनुदानापासून जे   थेट लाभार्थ्याच्या  बँक खात्यात जमा केले जाईल. ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, लोकांवर कोणत्याही  खर्चाचा बोझा पडणार नाही याची खात्री केंद्र सरकार करेल. योजनेतील संबंधित  सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर  एकत्रित केले जाईल, त्यामुळे ही योजना राबवणे अधिक सुकर होणार आहे.’’

या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्‍ये घराच्या छतावर  सौर ऊर्जा प्रणाली बसविण्‍यासाठी  प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल  कमी येईल  आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल.”

चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत  पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ  करण्‍याचे आवाहन करतो. त्यासाठी संकेतस्‍थळ पुढीलप्रमाणे आहे.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai