Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्‌घाटन


नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

जीपीएआय हा 29 सदस्य देशांचा बहुपक्षीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात वापर यातील तफावत भरून काढणे, आणि एआय शी संबंधित प्राधान्ये तसेच, संशोधनाला पाठिंबा देणे, असा आहे. 2024 साली भारताकडे जीपीएआयचे अध्यक्षपद आहे. 2020 साली स्थापन झालेल्या जीपीएआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जीपीएआयचे समर्थक अध्यक्ष आणि 2024 मध्ये जीपीएआयचे प्रमुख अध्यक्ष म्हणून भारत 12 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत वार्षिक जीपीएआय शिखर परिषदेचे आयोजन करत आहे

या शिखर परिषदेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा प्रशासन आणि एम. एल. कार्यशाळा यासारख्या विविध विषयांवर अनेक सत्रे आयोजित केली जातील शिखर परिषदेतील इतर आकर्षणांमध्ये संशोधन परिसंवाद, एआय गेमचेंजर्स पुरस्कार आणि इंडिया एआय प्रदर्शन यांचा समावेश आहे.

या शिखर परिषदेत देशभरातील 50 हून अधिक जीपीएआय तज्ञ आणि 150 हून अधिक वक्त्यांचा सहभाग असेल.  याव्यतिरिक्त, इंटेल, रिलायन्स जिओ, गुगल, मेटा, एडब्ल्यूएस, योट्टा, नेटवेब, पेटीएम, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड, एनआयसी, एसटीपीआय, इमर्स, जिओ हॅप्टिक, भाषिणी यासह विविध कार्यक्रमांमध्ये जगभरातील आघाडीचे एआय गेमचेंजर्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञ सहभागी होतील. याव्यतिरिक्त, युवा एआय उपक्रम आणि स्टार्ट-अप्स अंतर्गत विजेते असलेले विद्यार्थी त्यांचे एआय मॉडेल आणि त्यांच्या मदतीने समस्यांवरील उपाय या प्रदर्शनात मांडले जातील.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai