माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. हिवाळा आता संपतो आहे. वसंत ऋतूने आपल्या सर्वांच्या जीवनात प्रवेश केला आहे. पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते, फूले फुलतात, बागा बहरून येतात, पक्षांचा किलबिलाट मन मोहून टाकतो, उन्हामुळे केवळ फूलेच नव्हे तर फळेसुद्धा झाडांच्या फांद्यांवर चमकताना दिसतात. ग्रीष्म ऋतूचे फळ असणाऱ्या आंब्याचा मोहोर वसंतातच दिसू लागतो. त्याचवेळी शेतात मोहोरीची पिवळी फुले, शेतकऱ्यांच्या मनाला नवी उभारी देतात. पळसाची वाळलेली फूले होळी आल्याचा संकेत देतात. निसर्गात होणाऱ्या या बदलाच्या क्षणाचे अमिर खुसरो यांनी मोठे मजेदार वर्णन केले आहे. अमीर खुसरो लिहितात,
“फूल रही सरसों सकल बन,
अंबवा फूटे, टेसू फूले,
कोयल बोले, डार-डार.”
जेव्हा निसर्ग प्रसन्न असतो, वातावरण आनंदी असते, तेव्हा मनुष्यही या ऋतूचा पूर्ण आनंद घेतो. वसंत पंचमी, महाशिवरात्र आणि होळीचा सण मानवी जीवनात आनंदाचे रंग भरतो. प्रेम, बंधुभाव आणि मानवता यांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आपण फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देणार आहोत आणि येणाऱ्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. वसंत ऋतू म्हणजे या दोन महिन्यांचा संगम आहे.
सर्वात आधी मी देशातील लाखो नागरिकांचे यासाठी आभार मानतो की, ‘मन की बात’ आधी जेव्हा मी आपल्याकडून मते मागवतो, सूचना मागवतो, तेव्हा माझ्याकडे मोठ्या प्रमाणात सूचना येतात. नरेंद्र मोदी ऍप वर, ट्विटरवर, फेसबुकवर, पोस्टाने येतात. यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.
शोभा जालान यांनी नरेंद्र मोदी ऍपवर मला असे लिहून पाठवले आहे की, बहुतांश जनता इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल अनभिज्ञ आहे आणि म्हणून त्या म्हणतात की, १०४ उपग्रह आणि लक्ष्यवेधी वेगवान क्षेपणास्त्र याबद्दल मी माहिती द्यावी. शोभाजी, भारताच्या या अभिमानस्पद कामगिरीचे आपण स्मरण केले, याबद्दल आपले आभार. गरिबीनिर्मूलन असो, रोगांपासून बचाव असो, जगाबरोबर जोडून घेणे असो, ज्ञान, माहिती पोचवणे असो. तंत्रज्ञानाने, विज्ञानाने आपले महत्व अधोरेखित केले आहे. १५ फेब्रुवारी २०१७, भारताच्या जीवनातला गौरवास्पद दिवस आहे. आपल्या वैज्%
Lauded @isro for their outstanding achievement of launching 104 satellites in one go, during today’s #MannKiBaat https://t.co/CdfWUJud8F
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
Spoke about Digi Dhan Melas & their role in furthering digital transactions & creating a corruption-free India. https://t.co/VnIyL1Zjfj
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
I call upon the people of India to download the BHIM App & get 125 more people to download the App by 14th April, Dr. Ambedkar’s Jayanti
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
Congratulated team for winning Blind T20 cricket world cup. India is immensely proud of their success. #MannKiBaathttps://t.co/srAq2h2rq8
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
This toilet pit emptying exercise undertaken by the Drinking Water & Sanitation Ministry is remarkable! https://t.co/rSX6GEyvhQ
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
“भारत की नारी है, सब में बराबर की अधिकारी है”…a tribute to Nari Shakti in today’s #MannKiBaat https://t.co/2Uj0XrrGE1
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
Hear the complete #MannKiBaat episode of February 2017 here. https://t.co/vM7B0MaFBh
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017
असमिया, बंगाली, गुजराती, मैथिली, मराठी, पंजाबी, तमिल, कन्नड़ सहित 20 से भी ज्यादा भाषाओं में सुनें #MannKiBaat https://t.co/tTkaXQYi90
— Narendra Modi (@narendramodi) 26 February 2017