Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर्मनीच्या चान्सलर सोबत द्विपक्षीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर्मनीच्या चान्सलर सोबत द्विपक्षीय बैठक


नवी दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांची आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत  द्विपक्षीय  बैठक झाली. या वर्षात शोल्ज यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. या आधी फेब्रुवारी महिन्यातही ते भारतात आले होते.

जी-20 च्या यशस्वी अध्यक्षीय कारकीर्दीबद्दल चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जर्मनीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल, तसेच जी-20 च्या विविध उच्चस्तरीय बैठका आणि कार्यक्रमांमधे सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय राजनैतिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. संरक्षण, हरित तसेच शाश्वत विकास, महत्वाची खनिजे, कुशल मनुष्यबळाची देवाणघेवाण आणि शिक्षण अशा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.

परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांवरही दोन्ही नेत्यांनी आपली मते मांडली.

आंतरसरकारी आयोगाच्या पुढच्या फेरीसाठी पुढच्या वर्षी भारतात येण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी चान्सलर ओलाफ शोल्ज यांना दिले.

***

V.Chitnis/R.Aghor/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai