Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत बैठक


नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदे दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रट्टे यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली.

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल तसेच शिखर परिषदेच्या आयोजनाबद्दल नेदरलँड्सचे पंतप्रधान रट्टे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. तसेच, चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दलही त्यांनी भारताचे अभिनंदन केले. त्याशिवाय, आदित्य एल वन या सौरमोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. 

दोन्ही नेत्यांनी यावेळी, द्वीपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यात, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि हरित हायड्रोजन, सेमीकंडक्टर्स, सायबर आणि डिजिटल तंत्रज्ञान यासह इतर काही विषयांचा परामर्श घेण्यात आला.

तसेच, या बैठकीत, परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक विषयांवरही चर्चा झाली.

***

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai