आदरणीय महोदय, पंतप्रधान मित्सो-तकिस,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांमधील मित्रहो,
नमस्कार!
सर्वप्रथम, ग्रीसमध्ये जंगलातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो, आणि आगीत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
मित्रहो,
ग्रीस आणि भारताचा सहयोग, स्वाभाविक आहे.
जगातील दोन प्राचीन संस्कृतींमधील,
जगातील दोन सर्वात जुन्या लोकशाही विचारधारांमधील, आणि
जगातील प्राचीन व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांमधील सहयोग आहे.
मित्रहो,
आपल्या संबंधांचा पाया जितका प्राचीन तितकाच तो मजबूत आहे.
विज्ञान, कला आणि संस्कृती, अशा सर्व विषयांचे ज्ञान आपण एकमेकांकडून घेतले आहे.
आज, आपल्यात भू-राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उत्तम समन्वय आहे, – मग ते हिंद प्रशांत महासागर क्षेत्र असो, की भूमध्यसागरीय क्षेत्र.
दोन जुन्या मित्रांप्रमाणे आपल्याला एकमेकांच्या भावना समजतात आणि आपण त्याचा आदर करतो.
चाळीस वर्षांच्या दीर्घ काळानंतर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी ग्रीसला भेट दिली आहे. तरीही, ना आपल्या नात्याची खोली कमी झाली, ना स्नेह कमी झाला. म्हणूनच, आज मी आणि ग्रीसच्या पंतप्रधानांनी भारत-ग्रीस भागीदारी ‘सामरिक’ पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण आणि सुरक्षा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवून आम्ही धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो,
संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात, दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांसह संरक्षण उद्योगांना चालना देण्यावर आमच्यात सहमती झाली आहे. आज आम्ही दहशतवादविरोधी आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावरही चर्चा केली.
आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवरही संवादासाठी एक संस्थात्मक व्यासपीठ असावे, असे आम्ही ठरवले.
पंतप्रधान आणि मी सहमत आहोत की आमचा द्विपक्षीय व्यापार झपाट्याने वाढत आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची अपार क्षमता आहे. त्यामुळे 2030 पर्यंत आमचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. आज, थोड्याच वेळात, पंतप्रधान एका व्यावसायिक बैठकीचे आयोजन करणार आहेत.
यामध्ये आम्ही दोन्ही देशांच्या व्यावसायिक प्रतिनिधींसोबत काही विशिष्ट क्षेत्रांवर चर्चा करणार आहोत.
आम्हाला विश्वास आहे की ,आपल्या देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याला एका नवीन पातळीवर नेऊ शकतो
आज कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी करार करण्यात आला.
या करारामुळे आपण कृषी आणि बियाणे उत्पादन तसेच संशोधन, पशुसंवर्धन आणि पशुधन उत्पादन क्षेत्रात सहकार्य करू शकतो.
मित्रहो,
उभय देशांमधील कुशल स्थलांतरण सुलभ करण्यासाठी, आम्ही लवकरच स्थलांतर आणि वाहतूक सहकार्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचा असा विश्वास आहे की, आमच्या लोकांमधील प्राचीन परस्पर संबंधांना नवीन आकार देण्यासाठी सहकार्य वाढवले पाहिजे
आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला चालना देऊ
मित्रहो,
आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही चर्चा केली.
भारत-ईयू व्यापार आणि गुंतवणूक करारासाठी ग्रीसने आपला पाठिंबा व्यक्त केला.
युक्रेनच्या बाबतीत, दोन्ही देश मुत्सद्देगिरी आणि संवादाचे समर्थन करतात.
संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मी ग्रीसच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
भारताच्या जी 20 च्या अध्यक्षपदासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
मित्रहो,
मला आज “ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर” ने सन्मानित केल्याबद्दल मी हेलेनिक प्रजासत्ताकच्या नागरिकांचे आणि राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो.
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आणि कृतज्ञता व्यक्त केली.
भारत आणि ग्रीसची सामायिक मूल्ये आमच्या दीर्घ आणि विश्वासार्ह भागीदारीचा पाया आहेत.
लोकशाहीची मूल्ये आणि आदर्श प्रस्थापित करण्यात आणि यशस्वीपणे आचरणात आणण्यात दोन्ही देशांचे ऐतिहासिक योगदान आहे.
मला विश्वास आहे की ,भारतीय आणि ग्रीको-रोमन कलेचे सुंदर मिश्रण असलेल्या गांधार कला विद्यालयाप्रमाणे, भारत आणि ग्रीस यांच्यातील मैत्री देखील काळाच्या दगडावर आपली अमिट छाप सोडेल.
ग्रीसच्या या सुंदर आणि ऐतिहासिक शहरात आज मला आणि माझ्या शिष्टमंडळाला मिळालेल्या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा पंतप्रधान आणि ग्रीसच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद.
***
S.Bedekar/R.Agashe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the press meet with @PrimeministerGR @kmitsotakis. https://t.co/57O1PG31iD
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2023
ग्रीस और भारत- ये एक स्वाभाविक मिलन है
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
-विश्व की दो पुरातन सभ्यताओं के बीच,
-विश्व के दो पुरातन लोकतान्त्रिक विचारधाराओं के बीच, और
-विश्व के पुरातन व्यापारिक और सांस्कृतिक संबंधों के बीच: PM @narendramodi
आज हमारे बीच Geo-political , International और Regional विषयों पर बेहतरीन तालमेल है- चाहे वो इंडो-पैसिफ़िक में हो या मेडीटिरेनियन में।
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
दो पुराने मित्रों की तरह हम एक दूसरे की भावनाओं को समझते हैं और उनका आदर करते हैं: PM @narendramodi
40 वर्षों के लंबे अंतराल के बाद भारत के किसी प्रधानमंत्री का ग्रीस आना हुआ है।
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
फिर भी, ना तो हमारे संबंधों की गहराई कम हुई है, ना ही रिश्तों की गर्मजोशी में कोई कमी आई है: PM @narendramodi
दोनों देशों के बीच skilled migration को सुगम बनाने के लिए, हमने जल्द ही एक माइग्रैशन एण्ड मोबिलिटी partnership एग्रीमेंट करने का निर्णय लिया।
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
हमारा मानना है कि अपने प्राचीन people to people संबंधों को नया रूप देने के लिए हमें सहयोग बढ़ाना चाहिए: PM @narendramodi
ग्रीस ने India-EU trade और इनवेस्टमेंट एग्रीमेंट पर अपना समर्थन प्रकट किया।
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
यूक्रेन के मामले में, दोनों देश Diplomacy और Dialogue का समर्थन करते हैं: PM @narendramodi
मैं हेलेनिक Republic के लोगों और राष्ट्रपति जी का हार्दिक धन्यवाद करता हूँ कि आज उन्होंने मुझे “Grand Cross of the Order of Honour” से सम्मानित किया।
— PMO India (@PMOIndia) August 25, 2023
140 करोड़ भारतीयों की ओर से मैंने यह पुरस्कार स्वीकार किया और अपना आभार व्यक्त किया: PM @narendramodi