पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.
या नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाण-घेवाण केली.
सुदानमधून भारतीय नागरिकांना एप्रिल 2023 मध्ये जेद्दाहमार्गे बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबियाने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे आभार मानले. तसेच त्यांना आगामी हज यात्रेसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या.
युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सध्या सुरू असलेल्या जी– 20च्या भारताच्या अध्यक्षतेला पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि आपण आगामी काळात होणा-या भारत भेटीसाठी उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
उभय नेत्यांनी संपर्क कायम ठेवण्याविषयी सहमती दर्शवली.
***
SonaliK/SuvarnaB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Spoke to Saudi Arabia's Crown Prince & PM HRH Prince Mohammed bin Salman. Discussed boosting ties in connectivity, energy, defense, trade & investment, and exchanged views on regional and global issues. Appreciated his support in safe evacuation of Indians from Sudan and for Haj.
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2023