Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबादमधील सिंकदराबाद रेल्वे स्थानकात सिकंदराबादतिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. सिंकदराबाद रेल्वे स्थानकात आल्यानंतर पंतप्रधानांनी सिकंदराबादतिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि गाडीच्या कर्मचारी वर्गाशी तसेच लहान मुलांशी संवाद साधला.

 

पंतप्रधानांचा ट्विटर संदेश

सिकंदराबाद आणि तिरुपती यांच्या कनेक्टीव्हिटीत वाढ करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची झेंडा दाखवून सुरुवात.तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या जनतेचे ही गाडी सुरू झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो.

माहिती तंत्रज्ञानाचे शहर अशी ओळख असलेले हैदराबाद आणि भगवान वेंकटेश्वराचे धाम तिरुपती यांना जोडणारी सिकंदराबादतिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस ही अवघ्या तीन महिन्यांच्या काळात तेलंगणातून सुरू झालेली दुसरी वंदे भारत रेल्वेगाडी आहे. या रेल्वेगाडीमुळे दोन शहरांमधल्या प्रवासासाठी लागणारा वेळ जवळपास साडेतीन तासांनी कमी होणार असून त्याचा फायदा यात्रेकरूंना होईल.

या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तमिळसाई सौंदरराजन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी उपस्थित होते.

***

N.Chitale/R.Bedekar/Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai