नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान समरकंद येथे या उभय नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर, आजच्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या अनेक पैलूंचा आढावा घेतला. यात ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध संघर्षाच्या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच यातून पुढे जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारताच्या सुरु असलेल्या जी -20 च्या अध्यक्षपदाची माहिती दिली आणि या अध्यक्षपदाचे प्रमुख प्राधान्यक्रम अधोरेखित केले. शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उभय देश एकत्र काम करतील ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परस्परांच्या नियमित संपर्कात राहण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai