Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाली येथे जी-20 शिखर परिषदेदरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाली येथे जी-20 शिखर परिषदेदरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांची घेतली भेट


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाली येथे जी-20 शिखर परिषदेदरम्यान सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांची भेट घेतली. गेल्या वर्षी रोममध्ये झालेल्या जी -20 शिखर परिषदेच्या वेळी ली यांच्याशी झालेल्या भेटीच्या  आठवणीला  पंतप्रधान  मोदी यांनी यावेळी उजाळा दिला.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील मजबूत धोरणात्मक भागीदारीची नोंद उभय नेत्यांनी घेतली. सप्टेंबर 2022 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज संमेलनाच्या उद्घाटन सत्राबरोबरच होत असलेल्या नियमित उच्चस्तरीय मंत्री आणि संस्थात्मक संवादांचीही दोन्ही पंतप्रधानांनी दखल घेतली.

फिनटेक, अक्षय ऊर्जा, कौशल्य विकास, आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रात दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध अधिक विस्तारित करण्याच्या वचनबद्धतेचा दोघांनी पुनरुच्चार केला. भारतात हरित अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि डिजिटलायझेशन यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन भारताने सिंगापूरला केले. तसेच भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा योजना, मालमत्ता मुद्रीकरण योजना आणि गती शक्ती योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठीही भारताने सिंगापूरला आमंत्रित केले.

अलीकडच्या  ताज्या जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवरही बैठकीत विचार विनिमय झाला. भारताच्या ॲक्ट ईस्टधोरणातील सिंगापूरच्या भूमिकेचे आणि आसियान-भारत संबंधांसाठी सिंगापूरने बजावलेल्या समन्वयक भूमिकेचे  मोदी यांनी कौतुक केले. भारत-आसियान बहुआयामी सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या इच्छेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

 मोदी यांनी ली यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.

 

  S.Bedekar/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai