नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
राजभवन, गांधीनगर इथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, आज मोरबी इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मोरबी इथे अपघात घडल्यापासून घटनास्थळी करण्यात येणाऱ्या बचाव आणि मदतकार्याबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा, पीडितांना शक्यतो सर्व मदत केली जावी यावर भर दिला.
या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गृहराज्य मंत्री हर्ष सांघवी, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक तसेच, गुजरातच्या गृह मंत्रालयातले आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्चाधिकारी उपस्थित होते.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai