Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संभाषण केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीद्वारे संभाषण केले. नवी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी मे यांचे अभिनंदन केले.

गेल्या नोव्हेंबरमध्ये ब्रिटनला आपण दिलेली भेट संस्मरणीय झाल्याचे सांगतानाच उभय देशातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याप्रती भारताची कटिबध्दता पंतप्रधानांनी दर्शवली.

विविध जागतिक मंचावर ब्रिटनने भारताला सातत्याने व्यक्त केलेल्या पाठिंब्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठीही सहकार्य वृध्दींगत करायला आपण उत्सुक असल्याचे मे यांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/AK