Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26.06.2016)


माझ्या प्रिय देशवासीयांनो, माझा तुम्हाला नमस्कार. गेल्या वर्षी आपण उन्हाळ्यामुळे झालेला त्रास, पाण्याचा अभाव, दुष्काळी परिस्थिती, अशा कितीतरी समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले, समस्यांमधून जावे लागले. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून, वेगवेगळ्या ठिकाणांहून पाऊस पडल्याच्या बातम्या येत आहेत. ह्या पावसाच्या बातम्यांबरोबर एक ताजेपणा, टवटवीतपणाचा अनुभवही आपण घेत आहोत. ह्याचा अनुभव तुम्हीही घेत असाल आणि ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ सांगत आहेत, की ह्या वर्षी पाऊस चांगला पडेल, सर्व ठिकाणी पडेल त्याचप्रमाणे पाऊस त्याच्या ऋतुप्रमाणे संपूर्ण कालखंडात पडणार आहे. ह्या सर्व बातम्या आपल्या मनात उत्साह निर्माण करणाऱ्या आहेत. मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ह्या चांगल्या पावसासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे.

आमच्या देशात ज्याप्रमाणे शेतकरी मेहनत करत आहेत, त्याचप्रमाणे आमचे शास्त्रज्ञही आमच्या देशाला नव्या उत्तुंग उंचीवर नेण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यांना सफलता मिळत आहे. आणि माझे पहिल्यापासून असे मत आहे की, आमच्या नवीन पिढीने शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्ने बघावीत, विज्ञानात रुची घ्यावी, येणाऱ्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि या नवीन पिढीने त्यात अग्रेसर व्हावे. मी आज एक आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्हाला सांगत आहे. काल मी पुण्याला गेलो होतो, ‘स्मार्ट सिटी प्रॉजेक्ट’च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने तेथे कार्यक्रम होता आणि मी ज्या अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वत: मेहनत करुन, स्वत: उपग्रह बनवला होता आणि त्याचे 22 जूनला प्रक्षेपण करण्यात आले होते, त्या मुलांना भेटण्यासाठी बोलावले होते. कारण माझ्या मनात इच्छा होती की, त्या मुलांना बघू तरी, भेटू तरी, त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, उत्साह आहे, त्याचा अनुभव घेऊ. गेल्या काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी ह्या कामात आपले योगदान दिलेले आहे. हा शैक्षणिक उपग्रह एका प्रकारे भारतीय युवकांच्या इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण आहे. हा उपग्रह आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. ह्या छोट्या उपग्रहामागे जी स्वप्ने आहेत ती खूप मोठी आहेत. त्यांची ही झेप खूप उंच आहे आणि जी मेहनत आहे ती खूप सखोल आहे. जसे पुण्याच्या विद्यार्थ्यांनी केले, तसेच तामिळनाडू, चेन्नईच्या सत्यभामा विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील एक उपग्रह बनवला आणि ‘सत्यभामा सॅट’ याचेही प्रक्षेपण केले गेले. आम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकत आलो आहोत, प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची, आकाशाला स्पर्श करण्याची आणि काही तारे मुठीत बंद करण्याची इच्छा नेहमीच असते आणि हे पाहता इस्रोने पाठवलेल्या, विद्यार्थ्यांनी बनवलेले दोन्ही उपग्रह माझ्या दुष्टीने खूप महत्त्वपण आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व विद्यार्थी अभिनंदनाला योग्य आहेत. मी आमच्या देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण 22 जूनला आमच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एकावेळी 20 उपग्रह अंतराळात पाठवून आपलाच जुना विक्रम मोडून नवीन विक्रम केला आहे आणि ही आनंदाची गोष्टी आहे की, भारताने हे जे वीस उपग्रह पाठवले, त्यामध्ये 17 उपग्रह इतर ‍देशांचे आहेत. अमेरिकेसहित अनेक देशांचे उपग्रह भारताच्या भूमीवरुन पाठवले. भारतय शास्त्रज्ञांनी केलेले आणि त्याबरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी केलेले उपग्रहही अंतराळत पोहचले आहेत. आणि हे महत्त्वाचे आहे कि, इस्रोने कमी किमतीत आणि यशस्वीपणे हे उपग्रह पाठवून जगात आपले वेगळे स्थान मिळवले आहे आणि त्यामुळेच जगात उपग्रह प्रक्षेपणासाठी सर्व देशांच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही गोष्ट भारतामधील जनतेच्या मनामध्ये ‘मन की बात’ झाली आहे. परंतु काही घटना त्यामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येतात, नवीन उत्साह निर्माण करतात. ह्यावेळी 10-12वीच्या परिक्षांचे निकाल लागले, आमच्या मुली त्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांनी शिक्षणामध्ये बाजी मारली आहे. देशवासीयांनो आम्हाला अभिमानास्पद अशी महत्त्वाची गोष्ट आहे की 18 जूनला पहिल्यांदा आपल्या हवाईदलात महिलांची पहिली लढाऊ वैमानिकांची तुकडी सामील झाली. भारतीय हवाईदलामध्ये महिला वैमानिकांची पहिली तुकडी हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले. किती अभिमानास्पद आहे की, आमच्या तीन फ्लाईंग ऑफिसर मुली अवनि चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना, ह्या आम्हाला अभिमानास्पद आहेत. फ्लाईंग ऑफिसर अवनि मध्य प्रदेशातील ‘रीवा’ इथली आहे, फ्लाईंग ऑफिसर भावना बिहारमधील बेगुसराईमधली आहे आणि फ्लाईंग ऑफिसर मोहना गुजरातमधील बडोद्याची आहे. आपण पाहिले की ह्या तीनही मुली हिंदुस्थानामधील महानगरातील नाहीत. त्या आपल्या आपल्या राज्यांच्या राजधानीमधून देखील आलेल्या नाहीत. छोट्या शहरामधून असून देखील त्यांनी आकाशापेक्षा उंच होण्याची स्वप्ने बघितली आणि पुरीदेखील केली. मी अवनि, मोहना, भावना या तीन मुलींना आणि त्यांच्या आई-वडलांना खूप खूप शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, काही दिवसापूर्वी 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’च्या वर्धापन दिनाबद्दल भव्य कार्यक्रम केले गेले. नात्याने जेव्हा संपूर्ण विश्व ‘योगा’बरोबर जोडले जाते, तेव्हा एक भारतीय म्हणून आम्हाला असा अनुभव येतो की हे विश्व आमच्या काल, आज आणि उद्या बरोबर जोडले गेलेले आहे. विश्वाबरोबर आमचे अनोखे नाते जोडले जात आहे. भारतामध्येपण जवळ जवळ एक लाखापेक्षा जास्त ठिकाणी उत्साहात, निरनिराळ्या रंग-रुपाबरोबर आनंददायी वातावरणात आंतरराष्ट्रीय योग पर्व साजरे केले गेले. मला पण चंदीगडमध्ये हजारो योग करणाऱ्यांबरोबर योग करण्याची संधी मिळाली. अबाल वृद्धांचा उत्साह बघण्यासारखा होता. आपण पाहिले असेल, मागील आठवड्यात भारत सरकारने ह्या आंतरराष्ट्रीय योग-पर्वाच्या निमित्ताने ‘सूर्य नमस्कारा’ची टपाल तिकीटे काढली. ह्यावेळी संपूर्ण विश्वात ‘योग-दिवसा’च्या बरोबर दोन गोष्टींवर लोकांचे विशेष लक्ष गेले.

एक तर अमेरिकेत न्युयॉर्क शहरात जिथे संयुक्त राष्ट्रसंघाची इमारत आहे, त्या इमारतीवर योगासनाच्या वेगवेगळ्या कृतींचे विशेष सादरीकरण केले गेले आणि तिथे येणारे-जाणारे लोक फोटो काढत होते आणि संपूर्ण विश्वात ते फोटो बघितले गेले. ही गोष्ट भारताला गौरव देणारी नाही का? तुम्हीच सांगा! आणखी एक गोष्ट झाली तंत्रज्ञान आपले काम करत आहे. सोशल मिडियाची आपली एक स्वत:ची ओळख निर्माण झाली आणि ह्यावेळी ट्विटरने योगा इमेजच्या बरोबर सेलिब्रेशनचा एक वेगळा प्रयोग केला गेला. हॅशटॅग ‘योगा डे’ टाईप केल्यावर योगाची इमेजेस, फोटो आमच्या मोबाईलवर येत होती आणि विश्वभर ती पोहचली. योगाचा अर्थ आहे जोडणे. योगात संपूर्ण जगाला, जोडण्याची ताकद आहे. फक्त गरज आहे ती आपण योगाला जोडले जाण्याची!

मध्य प्रदेशामधील सतना येथील स्वाती श्रीवास्तव यांनी योग दिवसानंतर मला टेलिफोन केला आणि मला एक संदेश दिला. मला वाटते तो आपल्या सर्वांसाठी आहे, परंतु जास्त माझ्यासाठीच आहे.

“माझी अशी इच्छा आहे की, माझा पूर्ण देश निरोगी व्हावा, त्यातील गरीब व्यक्तीदेखील निरोगी रहावी. माझी अशी इच्छा आहे की, दूरदर्शनवर प्रत्येक मालिकेमध्ये ज्या जाहिराती येतात, त्यामध्ये एक जाहिरात योगाची माहिती देणारी असावी. योग कसा केला जातो, त्यापासून कोणते फायदे होतात?”

स्वातीजी आपली सूचना चांगली आहे, परंतु आपण जरा लक्ष देऊन बघाल, तर आपल्या लक्षात येईल नुसते दूरदर्शन नाही, तर हल्ली भारत आणि भारताबाहेर आणि संपूर्ण जगात टिव्ही चॅनेल्स कोणत्या ना कोणत्या स्वरुपात योगाला आपले योगदान देत आहेत. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे. आपण जर लक्ष देऊन पाहिले तर योगाविषयी माहिती जाणून घेण्यासाठीच हे सर्व होत आहे. आणि मी पाहिले आहे, जगात काही देश असे आहेत की जिथे चोवीस तास योगाला समर्पित केलेले चॅनल्स आहेत. आणि तुम्हाला माहित असेलच की जून महिन्यात ‘आंतरराष्ट्रीय योग’ दिवसानिमित्त दररोज ट्विटर आणि फेसबुक आपल्या माध्यमातून एक नवीन आसनाचा विडिओ शेअर करत होते. जर आपण (आयुष) आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेलात, तर 40-45 मिनिटानंतर, एका मागोमाग एक शरीराच्या भिन्न भिन्न भागांसाठी कशाप्रकारे योग करु शकतो, कोणत्याही वयाची माणसे करु शकतात, असा सोप्या योगाचा एक चांगला विडिओ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी आपल्याला पण आणि आपल्या माध्यमातून सर्व योग जिज्ञासूंना सांगत आहे की ते जरुर योगाबरोबर जोडले जावेत.

मी एकदा आवाहन केले होते की आम्ही असे म्हणतो की योग हा रोग मुक्तीचे माध्यम आहे, तर का नाही आपण सर्व एकत्र मिळून योग संबंधी जितके “स्कूल ऑफ थॉटस्”आहेत त्यांच्या, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येकाची आपली आपली प्राधान्य आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत, परंतु सर्वांचे अंतिम लक्ष्य, ध्येय एकच आहे. जितक्या प्रकारचे योग कार्यक्रम चालू आहेत. जितक्या प्रकारच्या योगाच्या संस्था चालू आहेत, जितक्या प्रकारचे योग गुरु आहेत, सगळ्यांना मी आग्रह केला आहे की, संपूर्ण वर्ष मधूमेहाच्या विरुद्ध, योगाद्वारे एक सफल अभियान आपण चालवू शकतो का? योगामुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो का? काही लोकांना यामध्ये सफलता मिळाली आहे. प्रत्येकाने आपापले मार्ग शोधून काढले आहेत आणि मला माहित आहे मधुमेहावर असा कोणता उपचार नाही. सतत औषधे घ्यावी लागतात. आणि मधुमेह असा राज रोग आहे की तो इतर सर्व रोगांना आमंत्रण देतो. वेगवेगळ्या रोगांचे ते प्रवेशद्वार आहे, आणि म्हणूनच प्रत्येकजण मधुमेहापासून स्वत:ला वाचवू पहात आहे. खूप लोकांनी या दिशेने काम केले आहे. काही मधुमेह झालेल्यांनी योगिक सरावाने मधुमेहाला नियंत्रित केले आहे. आपण आपले अनुभव लोकांमध्ये शेअर करावेत, असे मला वाटते. त्याला एक चळवळीचे रुप देऊ या, वर्षभर असे वातावरण निर्माण करुया. मी आपल्याला आग्रह करत आहे “हॅशटॅश योगा फाईटस् डायबेटिज्”ला वापरुन आपले अनुभव सोशल मिडियावर शेअर करा किंवा मला NarendraModiApp वर आपले अनुभव पाठवा. बघु तर खरे, कोणाचे काय अनुभव आहेत! प्रयत्न तर करु या! मी आपल्याला निमंत्रण देतो की आपण आपले अनुभव “Hashtag Yoga Fights Diabetes” वर शेअर करावेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधी कधी माझ्या “मन की बात”ची थट्टाही केली जाते, टीकाही केली जाते, कारण हे अशा करता शक्य आहे की आम्ही सर्व लोकशाही, लोकतंत्र मानणारे आहोत.

आज 26 जून आहे, मी आज आपल्याशी बोलत आहे, खासकरुन नवीन पिढीला सांगू इच्छितो, ज्या लोकशाहीचा आम्ही अभिमान बाळगतो, ज्या लोकशाहीने आम्हाला खूप मोठी ताकद दिली आहे, प्रत्येक नागरिकाला मोठी ताकद दिली आहे, परंतु 26 जून, 1975 हा पण एक दिवस होता. 25 जून च्या रात्री आणि 26 ची सकाळ संपूर्ण हिंदूस्थानाच्या लोकशाहीसाठी, अशी काळी रात्र होती की, भारतात त्यावेळी आणीबाणी लागू केली. नागरिकांचे सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले. देशाला तुरुंग बनवण्यात आला. जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर देशातील लाखो लोक, हजारो नेते, अनेक संगठनांना तुरुंगात ढकलले गेले. त्या काळ्या घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली, अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या, परंतु आज 26 जूनला मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा आपण विसरु नये आमची ताकद लोकशाही आहे, लोकशक्ती आहे, एक एक नागरिक आमची ताकद आहे. ह्याच प्रतिबद्धतेला आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे, ताकदवान बनवायचे आहे आणि भारतातील लोकांची ताकद आहे की त्यांनी लोकशाही जगून दाखवली आहे, जिवंत ठेवली आहे. वृत्तपत्रांवर बंदी असो, रेडिओ एकच भाषा बोलत असेल, तर दुसरीकडे देशातील जनतेला संधी मिळताच लोकशाहीवादी शक्तींचा परिचय करुन देते. ह्या गोष्टी देशासाठी मोठ्या शक्तीचे रुप आहे. भारतामधील सामान्य माणसाच्या लोकशाहीवादी शक्तीचे उत्तम उदाहरण आणीबाणीच्या वेळी दिसून आले आणि लोकशाही शक्तीचा हा परिचय, ही ओळख देशाने वारंवार लक्षात ठेवली पाहिजे. लोकांच्या शक्तीची जाणीव करत राहिले पाहिजे आणि लोकांच्या शक्तीला बळ मिळेल अशाप्रकारे प्रवृत्ती ठेवली पाहिजे आणि लोकांना एकमेकांशी जोडले गेले पाहिजे.

मी नेहमीच सांगत आलो आहे, लोकशाहीचा अर्थ असा नाही की लोक एकदा मतदान करतील, मत देतील आणि पाच वर्षे देश चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतील. नक्कीच नाही, मतदान करणे हे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे, परंतु त्याच्या अनेक बाजू आहेत, पहिली महत्त्वाची बाजू म्हणजे लोकांचा सहभाग. लोकांचा स्वभाव, लोकांची विचारशक्ती आणि सरकारे लोकांशी जितकी जास्त जोडली जातील तितकी जास्त देशाची ताकद वाढेल. लोक आणि सरकार यामधील दरीने आमच्या विनाशाला शक्ती दिली आहे. माझा हा नेहमी प्रयत्न आहे की लोकसहभागानेच देश पुढे चालला पाहिजे.

आता-आता माझ्या सरकारला 2 वर्षे पूरी झाली आहेत, काही आधुनिक विचार असणाऱ्या युवकांनी मला सूचना केली की इतक्या मोठ्या लोकशाहीबद्दल आपण गोष्ट करता तर आपल्या सरकारचे मुल्यांकन लोकांकडूनच करुन घ्या. एका प्रकारे वेगळ्या आव्हानाचाच हा प्रकार आहे, त्यामध्ये सूचनाही होती. परंतु माझ्या मनाला खरेच विचार करायला भाग पाडले. मी माझ्या वरिष्ठ साथीदारांमध्ये हा विषय मांडला, तर सर्व प्रथम प्रतिक्रिया अशीच होती की, नाही नाही साहेब, तुम्ही हे काय करु पाहता ? आज तंत्रज्ञान इतके बदलले आहे की कोणी एकत्र येऊन, गट बनवून तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला, तर पत्ता लागत नाही, मग सर्वेक्षण कसे करायचे, शोध कुठुन सुरु करायचा. त्यांनी आपली चिंता व्यक्त केली परंतु मला वाटले, “नाही – नाही धोका तर पत्करायलाच हवा, प्रयत्न तर केलाच पाहिजे, बघू काय होते ते”, आणि माझ्या देशवासीयांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळ्या भाषांचा उपयोग करुन जनतेला माझ्या सरकारचे मुल्यांकन करण्यासाठी आवाहन केले. निवडणुकांनंतर पण खूप सर्वेक्षण होतात, शोध घेतला जातो, निवडणुकीच्या वेळीही सर्व्हेक्षण होते, परंतु ज्या नमुन्यांनी घेतला जातो, त्याची व्याप्ती मोठी नसते. आपल्यापैकी खूप लोकांनी “Rate My Government.in” वर आपले मत प्रदर्शित केले. तसे पाहता लाखो लोकांनी इच्छा प्रकट केली परंतु 3 लाख लोकांनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मेहनत घेतली. आमच्यासाठी खूप वेळ दिला. मी त्या 3 लाख लोकांचा खूप आभारी आहे की त्यांनी स्वत:हून सक्रियता दाखवली, सरकारचे मुल्यांकन केले. मी निर्णयाची चर्चा करत नाही, आमच्या प्रसारमाध्यमातले लोक जरुर करतील. परंतु हा एक चांगला प्रयोग होता. तर मी जरुर सांगेन आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती की, हिंदुस्थानामधील सर्व भाषा बोलणारे, काना-कोपऱ्यात राहणारे, वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांनी ह्यामध्ये सहभाग घेतला आणि माझ्यासाठी सर्वात आश्चर्याची गोष्टही आहे की भारत सरकार जी ग्रामीण रोजगार योजना चालवत आहे, ह्या योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्या पोर्टलवर जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला. ह्याचा असा अर्थ होतो की, ग्रामीण जीवनाशी जोडल्या गेलेल्या, गरीबीशी जोडल्या गेलेल्या लोकांचे यात सक्रिय योगदान होते असा मी प्राथमिक कयास लावू शकतो, हे मला सर्वात जास्त आवडले. तर तुम्ही पाहिलेत एक दिवस तो पण होता, काही वर्षापूर्वी 26 जूनला लोकांचा आवाज दाबला गेला होता आणि हा आजचा काळ आहे की, जनता स्वत: ठरवते, बघते. सरकार ठीक करत आहे की चुकीचे? चांगले करत आहे की वाईट करत आहे. हीच तर लोकशाहीची ताकद आहे!

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आज मी एका विशेष गोष्टीबद्दल आग्रह धरत आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा कर इतके व्यापक होते की, करामध्ये चोरी करणे, गफलत करणे एक स्वभाव बनला होता. एक जमाना असा होता परदेशामधून वस्तू आणण्यासाठी खूप बंधने होती, तस्करी पण खूप प्रमाणात वाढत होती, परंतु हळुहळु काळ बदलत गेला आहे. आता करदात्याला सरकारच्या कर व्यवस्थेशी जोडणे कठीण राहिले नाही, परंतु जुन्या सवयी जात नाहीत. एका पिढीला अजूनही वाटते आहे की, सरकारपासून दूर राहणेच चांगले आहे. मी आज आपल्याला विनंती करत आहे, आग्रह करत आहे नियमांपासून पळून जाऊन आपण आपली सुख-शांती हटवून बसत आहात. कोणताही लहानातला लहान माणूस आम्हाला सतावू शकतो, आम्ही असे कां होऊ द्यावे? का नाही आम्ही स्वत: स्वत:च्या उत्पन्नासंबंधी, आपल्या संपत्तीच्या संबंधात, सरकारला खरी खरी माहिती द्यावी. एकदाच जे काही जुने राहिलेय त्यातून मुक्त व्हा. ह्या ओझ्यापासून मुक्त होण्याचा आग्रह मी माझ्या देशवासीयांना करत आहे, ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे, अघोषित उत्पन्न आहे त्यांच्यासाठी भारत सरकारने एक संधी दिली आहे की आपली अघोषित संपत्ती घोषित करावी. सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी विशेष सुविधा दिली आहे. दंड भरुन आपण अनेक प्रकारच्या ओझ्यांपासून मुक्त होऊ शकता. मी तुम्हाला खात्री देतो की, स्वेच्छेने जो आपल्या मिळकती संबंधात, अघोषित संपत्तीच्या संबंधात सरकारला जाणकारी देईल त्यांची सरकार तपासणी करणार नाही, चौकशी करणार नाही. इतकी संपत्ती कुठुन आली, कशी आली एकदाही विचारले जाणार नाही. म्हणून मी सांगतो ही चांगली संधी आहे की आपण एका पारदर्शी व्यवस्थांचा हिस्सा बनाल. ह्याबरोबर देशवासीयांना हे पण सांगू इच्छितो की ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत आहे, म्हणून सांगतो ही शेवटची संधी आहे असे समजा.

मी माझ्या संसदेतील सभासदांना पण सांगितले होते की 30 सप्टेंबरनंतर सरकारी नियमांशी जोडल्या न गेलेल्या कुठल्याही नागरिकाला त्रास झाला तर त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही, त्यांना मदत केली जाणार नाही. मी देशवासीयांना पण सांगू इच्छितो की, 30 सप्टेंबरनंतर असे काही होऊ नये की ज्यापासून आपल्याला काही त्रास होवो, म्हणून मी सांगत आहे, 30 सप्टेंबरच्या आधी आपण या संधीचा, लाभ घ्यावा आणि 30 सप्टेंबरनंतर मात्र होणाऱ्या त्रासापासून तुम्ही स्वत:ला वाचवा.

माझ्या देशवासीयांनो, आज मला ही गोष्ट ‘मन की बात’, मध्ये अशासाठी करावी लागली की मी आमचे महसूल विभाग आहेत, प्राप्तीकर, सीमाशुल्क आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर मी एक-दोन दिवस चर्चा केली, खूप विचार-विनिमय केला आणि मी त्यांना सरळ सरळ शब्दांत सांगितले की आपण नागरिकांना चोर समजू नये. आपण नागरिकांवर भरोसा ठेवू, विश्वास ठेवू, त्यांना विश्वासात घेऊ. जर ते नियमाबरोबर राहयला तयार आहेत, तर त्यांना प्रोत्साहित करुन प्रेमाने बरोबर घेवू. विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या वागणुकीतून आपण बदल घडवून आणायला हवा. करदात्याला विश्वास द्यायला हवा. मी आग्रहाने त्यांना या गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी बघत होतो की त्यांनाही वाटत आहे की आज देश पुढे जात आहे, प्रगती करत आहे, आम्ही सर्वांनी यामध्ये योगदान दिले पाहिजे. ह्या विचार-विमर्शातून ह्या ज्ञान संगमातून मी जाणून घेत होतो, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या या देशात दीड लाख लोक असे आहेत, की ज्यांचे करपात्र उत्पन्न पन्नास लाखापेक्षा जास्त आहे. ही गोष्ट कदाचित खरी वाटणार नाही. पन्नास लाखापेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असणारे मोठमोठया शहरात लाखोंच्या संख्येत दिसतात. एक-एक दोन-दोन कोटींचे बंगले बघूनच लक्षात येते की हे लोक पन्नास लाख उत्पन्नाच्या आतील कसे असू शकतील? याचा अर्थ असा आहे की काही तरी गडबड आहे, ही स्थिती बदलायला हवी आहे, आणि 30 सप्टेंबरच्या आधी बदलायला हवी आहे. सरकरने कोणतेही कठोर पाऊल उचलण्यापूर्वी जनता जनार्दनाला संधी दिली पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय बंधु-भगिनीनों अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. दुसऱ्या प्रकारे 30 सप्टेंबर नंतर येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळण्याचा हा मार्ग आहे. मी देशाच्या भल्यासाठी, देशामधील गरिबांच्या कल्याणासाठी हया कामात सहभागी होण्याचा आग्रह करत आहे आणि माझी अशी इच्छा नाही की 30 सप्टेंबरनंतर आपल्याला काही त्रास व्हावा.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, ह्या देशाचा सामान्य माणूस देशासाठी खूप काही करण्याची संधी शोधतो. जेव्हा मी लोकांना सांगितले. स्वयंपाकांच्या गॅसची सबसिडी सोडा, ह्या देशाच्या एक कोटी पेक्षा जास्त कुटुंबांनी स्वेच्छेने सबसिडी सोडली. मी खास करुन ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे. त्यांच्यासाठी खास उदाहरण देत आहे, मी काल जेव्हा स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमानिमित्त पुण्याला गेलो होतो, तेव्हा मला श्रीयुत चंद्रकांत दामोदर कुलकर्णी आणि त्यांच्या परिवाराला भेटण्याची सुसंधी मिळाली. मी त्यांना खास भेटायला बोलावले होते आणि त्याचे कारण काय आहे ते सांगतो, ज्यांनी कधीही कर चोरी केली असेल त्यांना माझी ही गोष्ट प्रेरणा देवो अगर न देवो, परंतु श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी याची गोष्ट मात्र त्यांना जरुर प्रेरणा देईल. तुम्हाला माहित आहे, त्याचे कारण काय आहे ते? चंद्रकांत कुलकर्णी हे सामान्य मध्यम वर्गीय परिवारातील व्यक्ती आहेत. सरकारी नोकरी करत होते. निवृत्त झाले. सोळा हजार रुपये त्यांना निवृत्ती वेतन मिळते आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि जे कर चोरी करणारे आहेत, त्यांना तर धक्काच बसेल की ज्या चंद्रकांत कुलकर्णी यांना फक्त 16000 निवृत्ती वेतन मिळते त्यांनी काही दिवसांपूर्वी मला पत्र लिहिले आणि त्यांत सांगितले की मी माझ्या 16000 निवृत्ती वेतनमधून दर महिना पांच हजार रुपये स्वच्छता अभियानाला दान करु इच्छितो आणि इतकेच नाही त्यांनी मला बावन्न चेक, बावन्न पोस्ट डेटेड चेक पाठवले. त्यावर प्रत्येक महिन्याची तारिख आहे. ज्या देशात सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर फक्त महिन्याला सोळा हजार रुपये मिळणाऱ्या आपल्या निवृत्ती वेतनामधून स्वच्छता अभियानासाठी पांच हजार रुपये महिन्याला देत असेल तर या देशात आम्हाला कर चोरी करण्याचा हक्क नाही. चंद्रकांत कुलकर्णी पेक्षा मोठे आम्हाला प्रेरणादायी कोणी दिसत नाही आणि स्वच्छता अभियानासाठी जोडल्या गेलेल्या लोकांसाठी चंद्रकांत कुलकर्णी पेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही. मी चंद्रकांत कुलकर्णी यांना स्वत: बोलविले, त्यांना भेटलो. त्यांचे आयुष्य माझ्या मनाला स्पर्श करुन गेले. त्या परिवाराला मी शुभेच्छा देतो. असे अनेक लोक असतील कदाचित मला त्यांची माहिती नाही परंतु हेच तर लोक आहेत, हीच तर लोक शक्ती आहे, हीच तर ताकद आहे. सोळा हजार रुपये निवृत्ती वेतन असलेली व्यक्ती 2 लाख 60 हजारांचे ॲडव्हान्स चेक मला पाठवते ही लहान-सहान गोष्ट आहे का ? आपणही आपल्या मनाला जरा तपासूया. आम्ही पण विचार करु की सरकारने आपली संपत्ती घोषित करण्यासाठी संधी दिली आहे, आपणही चंद्रकांतजींची आठवण ठेऊन या अभियानाला साथ देवू.

माझ्या प्रिय देशवासियांनो उत्तराखंडमधील पौडी गढवाल मधून संतोष नेगीजींनी फोन करुन आपला एक अनुभव सांगितला. जल संचय या संबंधी एक संदेश दिला आहे. त्यांचा हा अनुभव देशवासीयांनो तुमच्याही कामाला येईल. ते म्हणतात.

“आम्ही आपल्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या विद्यालयात, पावसाळा सुरु होण्यांपूर्वी चार फूटाचे लहान लहान अडिचशे खड्डे खोदले. मैदानाच्या शेवटच्या टोकापाशी खोदले, का तर तयात पावसाचे पाणी जमा व्हावे त्यामुळे खेळाचे मैदानही खराब झाले नाही, मुलांची बुडण्याची भीती नाही आणि करोडो लिटर पाणी जे मैदानाला लागत ते आम्ही वाचविले.

संतोषजी मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला हा संदेश दिलात आणि पौडी गढवाल, पहाडी प्रदेश, आणि तुम्ही तिथे काम केलेत. तुम्ही अभिनंदनास पात्र आहात आणि मला विश्वास आहे की देशवासी पावसाचा आनंद जरुर लुटु देत”परंतु हे पाणी म्हणजे परमात्म्याचा प्रसाद आहे. अपरंपार संपत्ती आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी आम्हाला काहीना काही प्रयत्न केले पाहिजेत. गावातल पाणी गावात, शहरातले पाणी शहरात आम्ही कसे अडवु या, पृथ्वी मातेला पुन्हा एकदा समृद्ध करण्यासाठी आपण ते पाणी परत जमिनीत कसे पोहचवायचे, पाणी आहे तर भविष्य आहे, जल हे तो कल है, पाणी हेच तर जीवनाचा आधार आहे. संपूर्ण देशात एक वातावरण बनले आहे, काही दिवसात प्रत्येक राज्यात जल संचयाचे अनेक प्रकल्प केले गेले. परंतु आता पाणी आले आहे, तर बघा, ते कुठेही जाऊ नये. जेवढी ही चिंता जीवन वाचवण्यासाठी आहे तितकीच चिंता पाणी वाचवण्यासाठी केली पाहिजे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला तर माहित आहे ‘एकोणीसशे बावीस’ हा क्रमांक आपल्या स्मरणशक्तीचा भाग बनला आहे. 1,9,2,2 एकोणीसशे बावीस. हा एकोणीसशे बावीस हा असा क्रमांक आहे की ज्यावर आपण मिसड् कॉल केला तर आपल्या आवडत्या भाषेत ‘मन की बात’ ऐकू शकता. आपल्या वेळेनुसार, आपल्या भाषेत मन की बात ऐकून देशाच्या विकास यात्रेत आपले योगदान देण्यासाठी आपणही तयार व्हा.

सर्व देशवासीयांना माझा नमस्कार.

धन्यवाद.

S. Tupe / D. J. Narayan