पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मान “आमिर अमानुल्लाह खान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेरातमधील ऐतिहासिक अफगाण-भारत मैत्री धरणाचे उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घानी यांनी मोदींना हा सन्मान प्रदान केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, “आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार प्रदान करून मला सन्मानित केल्याबद्दल अफगाणिस्तान सरकार प्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो.”
अफगाणिस्तान नागरिकांसोबतच परदेशी नागरिकांनी केलेल्या सेवेची प्रशंसा करण्यासाठी अफगाण सरकार द्वारा दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पदकामागे हे कोरलेले आहे. “निशान-ए दौलती गाजी आमिर अमानुल्लाह खान अर्थात राज्य आदेश गाजी आमिर अमानुल्लाह खान.”
पार्श्वभूमी
आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार, अफगाणिस्तानचे राष्ट्रीय नायक, अमानुल्लाह खान (गाजी) यांच्या नावावर दिला जातो. जे अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य लढाईतले लढवय्ये होते. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्त्व त्यांनी कुशलपणे सांगितले.
राष्ट्रीय नायक, राजा अमानुल्लाह यांनी अफगाणिस्तानच्या आधुनिकतावादी संविधानाचे नेतृत्व केले आणि त्यात समान अधिकार व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे मुद्दे समाविष्ट केले. त्यांनी देशाचे आधुनिकीकरण केले. मुली आणि मुलांकरीता शाळा सुरू केल्या तसेच युरोप व आशियासोबत अफगाणिस्तानचा व्यापार वृध्दींगत केला. किंग अमानुल्लाह यांचा स्वतंत्र आणि आधुनिक अफगाणिस्तानचे विजन आज देखील तितकेच प्रासंगिक आहे जितके त्यावेळी होते.
राजा अमानुल्लाह यांचे भारतासोबत मजबूत संबंध होते आणि वर्ष 1929 मध्ये ते काही कालावधीकरीता येथे आले होते.
4 जूनला हेरात येथे अफगाण-भारत मैत्री धरणाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आणि जगातील थोडक्यात परदेशी नेत्यांमधील एक आहेत. हे त्यांच्या विशिष्ट नात्याच्या ताकदीच्या प्रतीकासोबतच भारत-अफगाण संबंधांना वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांची व्यक्तीगत प्रतिबध्दता देखील दर्शवते.
अफगाणिस्तान सरकारने वर्ष 2006 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली. हा पुरस्कार याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, कजाकिस्तानचे राष्ट्रपती नुरसूल्तान नजरबायेव, तुर्किचे राष्ट्रपती रिसेप तईप एरडोगन, नाटाचे जनरल जेम्स जोन्स, पूर्व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आणि अध्यात्मिक नेता सिबगातुल्लाह मुजादिदी आणि अफगाणिस्तानचे मुख्य न्यायाधीश (सी जे) अब्दुल सलाम अजिमी यांना प्रदान करण्यात आला आहे.
S.Mhatre/B. Gokhale
My deepest gratitude to the Government of Afghanistan for conferring the Amir Amanullah Khan Award. pic.twitter.com/EfzeXIBdK1
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2016