Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलिया येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला, 3 वर्षात 5 कोटी लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलिया येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला, 3 वर्षात 5 कोटी लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलिया येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला, 3 वर्षात 5 कोटी लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरवणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बलिया येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ केला. पुढील तीन वर्षात दारिद्रयरेषेखालील 5 कोटी लाभार्थींना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो, हे नमूद करुन पंतप्रधान म्हणाले की, या शतकामध्ये जगभरातील सर्व कामगारांचे उद्दिष्ट संपूर्ण जगाला एकत्र आणणे हे असायला हवे.

केंद्र सरकारचा भर प्रामुख्याने गरीबांचे कल्याण करण्यावर आहे. याचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचा उल्लेख केला.

त्यांनी श्रमसुविधा पोर्टल आणि श्रमिकांना देण्यात आलेल्या कामगार ओळख क्रमांकाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी बलिया ही क्रांतीकारक मंगल पांडे यांची भूमी असल्याची आठवण करुन दिली आणि ते म्हणाले की, गेली अनेक दशके उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडील भाग विकासापासून वंचित राहिला असून, आता या भागात संपर्क यंत्रणा मजबूत केली जात आहे. उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देत आहे. ग्रामीण विद्युतीकरणातील वेगवान प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. गरीबीविरोधातील लढ्यात सामर्थ्य प्राप्त करायचे असेल, तर विकासाची मुळे भारताच्या पूर्वेकडील भागात पोहोचायला हवीत, असे ते म्हणाले.

योजनांची आखणी करताना निवडणुकांमधील लाभ लक्षात न घेता गरीबांचे कल्याण लक्षात घ्यायला हवे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ गरीबांना आणि विशेषत: महिलांना होईल.

S. Kane / N. Sapre