Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायलच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीद्वारे संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

सध्या सुरु असलेल्या कोविड महामारीबाबत आणि या आरोग्य संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्या देशाची रणनीती याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

औषध पुरवठ्याची उपलब्धता वाढवणे, उच्च तंत्रज्ञानाचा कल्पक वापर यासह, या महामारीवर मात करण्यासाठी, भारत आणि इस्रायल यांच्यात संभाव्य सहयोगाच्या शक्यतांचा विचार यावेळी झाला. यासंदर्भात परस्परात ताळमेळ राखण्याच्या दृष्टीने परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करण्याला या नेत्यांनी सहमती दर्शवली.

कोविड-19 महामारी म्हणजे आधुनिक इतिहासाला नवे वळण देणारी महत्वाची घटना असून,संपूर्ण मानव जगताच्या कल्याणासाठी नवी जागतिक संकल्पना निर्माण करण्याची संधी यामुळे प्राप्त होत आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाशी नेत्यनाहू यांनी सहमती दर्शवली.

R.Tidke/N.Chitale/P.Malandkar