पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीच्या चान्सेलर एंजला मर्केल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी, कोविड-19 महामारी, या संदर्भात आपापल्या देशातली यासंदर्भातली स्थिती आणि या आरोग्य समस्येशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोगाचे महत्व याबाबत चर्चा केली.
या महामारीत आवश्यक औषधांची आणि औषधी उपकरणाची अपुरी उपलब्धता याबाबत चर्चा करून या संदर्भात सहकार्याचे मार्ग शोधण्यासाठी या नेत्यांनी मान्यता दर्शवली.
कोविड -19 महामारी, आधुनिक इतिहासातले महत्वाचे वळण असून,मानवतेच्या कल्याणासाठी,जागतिकीकरणाचा नवा दृष्टीकोन निर्माण करण्याची संधी देऊ करत आहे या पंतप्रधानांच्या मताशी, जर्मनीच्या चान्सेलरनी सहमती दर्शवली.
जगभरातल्या लोकांसाठी,सुलभ योगक्रिया आणि रोग प्रतिकारक आयुर्वेदिक उपाय या संदर्भात भारताच्या पुढाकाराबाबत पंतप्रधानांनी जर्मनीच्या चान्सेलरना माहिती दिली. सध्याच्या विशेषतः लॉक डाऊनच्या परिस्थितीत,मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी या बाबी अतिशय उपयुक्त ठरतील असे त्या म्हणाल्या.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor