Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधल्या जामनगरला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधल्या जामनगरला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधल्या जामनगरला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधल्या जामनगरला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या जामनगर इथे वांद्रे- जामनगर हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.750 खाटांच्या गुरू गोविंदसिंह विस्तारित रुग्णालयाचे राष्ट्रार्पण आणि विविध सौनी प्रकल्पांचे त्यांनी उदघाटन केले.51 किमीच्या आजी -3 ते खिजडिया या वाहिनीच्या उदघाटनासह इतर विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्‌घाटन केले.

गुजरात मधली पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी, गुजरात सरकारने गेल्या दोन दशकांपासून केलेले कठोर परिश्रम त्यांनी विषद केले.गुजरातमध्ये टँकर राज ला परवानगी नाही या निर्धाराचा त्यांनी उल्लेख केला आणि सरदार सरोवर धरणामुळे गुजरातमधल्या जनतेला कसा लाभ झाला हे सांगितले.सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठीही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

गुजरातमधल्या आरोग्य क्षेत्रातल्या क्रांतीबद्दल प्रशंसा करतानाच गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमुळे गरीब जनतेला मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुषमान योजनेमुळे गरिबांना दर्जेदार आणि माफक दरातली आरोग्य सेवा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.

देशासमोरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी,अल्पकालीन नव्हे तर रचनात्मक आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारने दूरदृष्टीने आणलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला.पीएम-किसान ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीची दीर्घकालीन आणि सर्वंकष आराखडा असल्याचे ते म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना,पत पुरवठ्याची सुलभ उपलब्धता, जन स्नेही वस्तू आणि सेवा कर यामुळे युवावर्गाला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सैन्यदलाची प्रशंसा करताना,संपूर्ण देशाला आपल्या सैनिकांचा अभिमान आहे असे सांगून दहशतवादाचा धोका नष्ट करायला हवा असे पंतप्रधान म्हणाले.

*****

B.Gokhale/N.Chitale/P.Kor