Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान यांनी जपानच्या पंतप्रधानांसमवेत नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2015 रोजी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य

पंतप्रधान यांनी जपानच्या पंतप्रधानांसमवेत नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2015 रोजी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य

पंतप्रधान यांनी जपानच्या पंतप्रधानांसमवेत नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2015 रोजी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य

पंतप्रधान यांनी जपानच्या पंतप्रधानांसमवेत नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2015 रोजी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य

पंतप्रधान यांनी जपानच्या पंतप्रधानांसमवेत नवी दिल्लीत 12 डिसेंबर 2015 रोजी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य


मान्यवर, पंतप्रधान ॲबे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी,

पंतप्रधान ॲबे यांचे भारतात स्वागत करतांना मला खूप आनंद होत आहे.

एक वैयक्तीक मित्र आणि भारत जपान सहकार्यातील महान व्यक्तीमत्वाचे स्वागत करतांना मी खूप खूश आहे.

भारताच्या आर्थिक बदलांमध्ये इतर कुठल्याही भागीदारापेक्षा जपानची भूमिका अतिशय निर्णायक राहिली आहे.

भारताची आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी जपान इतर कुठल्याही मित्र राष्ट्रापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.

आशिया आणि आमच्या एकत्रित जोडल्या गेलेल्या सागरी विभागाला आकार देण्यासाठी आमच्यापेक्षा अधिक कार्य करु शकेल अशा इतर कोणत्याही धोरणात्मक भागीदाराचा मी विचारही करु शकणार नाही.

त्यामुळेच आम्ही या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला अतिशय महत्त्वपूर्ण मानतो. या भागीदारीला भारतातील जनतेच्या अजोड सद्‌भावना आणि राजकीय सहमतीचीही जोड आहे. ज्यामध्ये आमच्या जनतेच्या मोठया आकांक्षा आणि जबाबदारीही अंतर्भूत आहे.

गेल्या वर्षभरात या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप कार्य केले आहे.

आर्थिक सहकार्यासोबतच आपल्या विभागातील भागीदारी आणि सुरक्षा सहकार्य या क्षेत्रातही आम्ही खूप प्रगती केली आहे.

पंतप्रधान ॲबे भारतासाठी अमोल बनलेल्या अनेक आर्थिक प्रस्तावांबाबत नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. आज भारतात गुंतवणूक करणाऱ्या जपानमधील खाजगी गुंतवणूकदारांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.

आज आमच्यातील एकत्रित प्रवासाने नवीन शिखरे पादाक्रांत केली आहे. आमच्यात झालेला नागरी अणुऊर्जा सहकार्य करार हा व्यापारी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी केल्या गेलेल्या करारापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.

हा करार शांततापूर्ण आणि सुरक्षित जगासाठीच्या उद्देशांकरता आपसातील विश्वास आणि धोरणात्मक भागीदारीच्या नव्या उंचीचे चमकते प्रतिक आहे.

मी जपानच्या या निर्णयाचे महत्त्व जाणतो. मी तुम्हाला विश्वास देतो की, भारत या निर्णयाचा पूर्ण सन्मान करेल आणि आपल्या संयुक्त कटिबध्दतेचाही सन्मान करेल.
जपानच्या शिंकनसेनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा निर्णयही ऐतिहासिकच आहे. शिंकनसेन उद्योग हा विश्वसनीयता, सुरक्षितता आणि गतीसाठी वाखाणला जातो.

आमच्या या प्रकल्पासाठी पंतप्रधान ॲबे यांनी सोप्या अटींवर दिलेल्या सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलरच्या असाधारण पॅकेज आणि तंत्रज्ञानविषयक सहाय्याबद्दल मला खूप कौतुक वाटते.

या प्रकल्पामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारतीय रेल्वे आणि भारतातील प्रवासाला गती देणाऱ्या नवीन क्रांतीची सुरुवात होईल.

हा प्रकल्प भारताच्या आर्थिक बदलाचा वाहकही होईल.

आम्ही जपानी द्विपक्षीय सहाय्यता कार्यक्रमात झालेली मोठी वाढ आणि मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी जपानमधील सार्वजनिक आणि खाजगी कटिबध्दतेचेही मोठे कौतुक करतो.

सप्टेंबर 2014 मध्ये टोकिया येथे पंतप्रधान ॲबे यांनी भारतात पुढील पाच वर्षात 35 अब्ज अमेरिकन डॉलरच्या जपानी वित्तीय गुंतवणूकीबाबत संबोधन केले होते.

ही अतिशय महत्त्वाकांक्षी गोष्ट होती पण आम्ही एकत्रितपणे ही गोष्ट सत्यात उतरवत आहोत.

हवामान बदल समस्येशी मुकाबला करण्याबाबत आमची संयुक्त प्रतिबध्दता ही देखील तेवढीच मजबूत आहे.

आम्ही स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापक सहकार्य करत आहोत आणि जगातील इतर देशांना फायदा होऊ शकेल अशा उपाययोजना निर्माण करत आहोत.

आज झालेले इतर करार आमच्या सहकार्यातील गांभीर्य आणि वैविध्य दर्शवतात.
आज आम्ही आमच्या सुरक्षाविषयक सहकार्याबाबत दोन आणखी निर्णायक पावले उचलली आहेत. हे दोन करार आमच्यातील सुरक्षाविषयक संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच भारतातील संरक्षणविषयक सामुग्री निर्मिती क्षेत्रासाठी प्रोत्साहक ठरतील.
सशस्त्र सैन्यदलाच्या तिन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये अधिक विस्तृत चर्चा व्हावी या आमच्या निर्णयाला या करारामुळे अधिक मजबूती येईल आणि मलबार नौसेना प्रात्यक्षिकांमध्ये जपान एक महत्त्वपूर्ण भागीदार बनेल.

गेल्या एक वर्षात आम्ही आमची विभागीय भागीदारी अधिक पुढे नेली आहे. आम्ही अमेरिकेसोबतच्या त्रिपक्षीय चर्चेचा स्तरही उंचावला आहे आणि ऑस्ट्रेलियासोबत एक नवीन सुरुवातही केली आहे.

या विभागात एक समग्र, संतुलित आणि खुल्या विभागीय सागरी सुरक्षेला प्राधान्‍य देण्यासाठी आम्ही पूर्व आशिया संमेलनात एकत्रित काम करु.

नौवहन आणि ओव्हर फ्लाईट तसेच सागरी व्यापार या क्षेत्रातील स्वातंत्र्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. आपसातील सर्व वाद शांततामय मार्गाने सोडवले पाहिजेत आणि सर्व देशांनी सागरविषयक मुद्दयांबाबत आंतरराष्ट्रीय कायदे आणि मापदंडाचे पालन केले पाहिजे.

अपेकमध्ये भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधान ॲबे देत असलेल्या समर्थनाचेही मी स्वागत करतो.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आम्हाला उचित स्थान मिळावे यासाठीही आम्ही पूर्णत: प्रयत्न करु.

संस्कृती आणि लोक हे कुठल्याही नात्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतात.

आमच्यातील विशेष संबंधांनाही अद्‌भूत मानवी स्पर्श लाभला आहे.

क्योटो – वाराणसी भागीदारी ही अशाच मजबूत प्रतिकांपैकी एक आहे.

गेल्यावर्षी पंतप्रधान ॲबे यांनी क्योटोमध्ये माझे स्वागत केले होते.

आज मी त्यांना वाराणसीचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक भविष्यासाठीच्या योजनांबाबत माहिती देणार आहे.

दोन्ही देशातील विशेष संबंधांना मान्यता देत येत्या 1 मार्च 2016 पासून व्यापारविषयक कारणांसह इतर कारणांसाठी भारताला भेट देणाऱ्या जपानी नागरिकांकरिता व्हिसा ऑन अरायव्हल ही सुविधा आम्ही प्रदान करणार आहोत.

जागतिक स्तरावर विस्तार केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्हिसा सोयीपेक्षा ही सोय वेगळी असेल.

मान्यवर, व्यापक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचा अंतर्भाव असलेल्या काळात काही भेटी या खरोखरच ऐतिहासिक किंवा आपसातील संबंधात परिवर्तन आणणाऱ्या असतात.

मान्यवर पंतप्रधान आपली भेट त्यापैकीच एक आहे.

भारत-जपान संबंधांबाबतचे व्हिजन 2025 साकार करण्यासाठी कार्य करत असतानाच आपण आपल्या लोकांच्या समृध्दीतही वाढ करु आणि आपल्या निती मूल्ये आणि स्वप्नांतील नव्या आशियाई शतकाला आकार देऊ.

धन्यवाद.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai