Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी मध्ये दीन दयाळ हस्तसंकुल येथे उत्कृष्टता केंद्राचे उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये दीन दयाळ हस्तसंकुल येथे उत्कृष्टता केंद्राचे आज उद्‌घाटन केले.

प्रवासी भारतीय दिनाच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधान सरळ उत्कृष्टता केंद्र उद्‌घाटन स्थळावर पोहोचले आणि 55 विभागांच्या उत्कृष्टता केंद्राचे बटन दाबून अनावरण केले. ही इमारत या क्षेत्रातील हस्तकलेसाठी अर्पण करण्यात आली आहे.

दीन दयाळ हस्तसंकुलच्या ॲम्पी थेटरच्या आधी पंतप्रधानांनी वस्त्रोद्योग प्रदर्शनीतल्या विविध गॅलरींना भेट दिली. त्यावेळी पंतप्रधानांनी ‘काशी: द युनिव्हर्स ऑफ क्राफ्टस अँड टेक्सटाइल्स’ आणि ‘इंडियन टेक्सटाइल्स : हिस्ट्री, स्प्लेंडोर, ग्रँड्युअर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.

त्यांनी वाराणसी मधील चौका घाट येथे एकात्मिक वस्त्रोद्योग कार्यालय इमारतीचे उद्‌घाटन बटन दाबून केले.

B.Gokhale/D. Rane