Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर भेटीदरम्यान केलेले 37 वे सिंगापूर व्याख्यान ‘इंडियन सिंगापूर स्टोरी’


महामहीम पंतप्रधान ली हिसेन लुंग,

महामहिम उप पंतप्रधान थरमन षणमुगारत्नम

मान्यवर मंत्रीगण

प्राध्यापक टॅन टाय याँग

मान्यवर

सिंगापूर भाषण देण्याचा सन्मान मला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

आधुनिक भारताला आणि या विभागातील आमच्या संबंधांना आकार देणाऱ्या राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी या महान नेत्यांच्या पदचिन्हावर मी मार्गक्रमण करत आहे, याचे भान मला आहे.

महामहिम पंतप्रधान, आपण येथे उपस्थित राहिल्यामुळे माझा सन्मान झाला आहे.
जी-20, आसियान आणि पूर्व आशिया परिषदेसाठी आपण गेल्या काही आठवड्यांचा काळ एकत्र घालवला आहे.

आपल्या दोन्ही देशांचे भवितव्य एकत्रितरित्या किती घट्ट विणलं गेलंय, हेच यातून दिसून येते.

स्वातंत्र्य मिळवून 50 वर्ष झाल्याबद्दल सिंगापूरच्या जनतेला मी 1 अब्ज 25 कोटी मित्र आणि चाहत्यांच्या शुभेच्छा पोहोचवत आहे.

मनुष्य आणि राष्ट्र यांच्या आयुष्यात काळाचे मैलाचे दगड हे नैसर्गिक असतात. पण केवळ काहीच देश सिंगापूर प्रमाणे अस्तित्वाची पहिली 50 वर्ष अभिमानाने आणि समाधानाने साजरी करू शकतात.

आधुनिक सिंगापूरचे निर्माते तसेच सध्याच्या काळातील उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे ली कुआन यू यांना आदरांजली अर्पण करून मी प्रारंभ करतो. त्यांचे कार्य त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर यशस्वी सिंगापूर पाहण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. आणि त्यांच्या पोलादी निर्धारामुळेच त्यांनी सिंगापूरला या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आणून पोहोचवलं.

त्यांचा प्रभाव जागतिक होता आणि भारतासाठी ते खऱ्या मैत्रीभावनेतून व्यक्त होणारे हितचिंतक होते. भारताची देशांतर्गत क्षमता आणि जागतिक पातळीवरील भूमिका यावर त्यांना भारतातील अनेक लोकांपेक्षाही त्यांचा जास्त विश्वास होता.

माझ्यासाठी ते वैयक्तिक प्रेरणास्थान होते. त्यांच्या सिंगापूरमधल्या कार्यापासून मी अनेक गोष्टी शिकलो.

आपल्यात घडवलेल्या बदलांपासूनच देशाच्या स्थित्यंतराला सुरुवात होते ही अतिशय परिणामकारक संकल्पना होती आणि तुमचे शहर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हे आधुनिक पायाभूत सुविधा निर्मिती एवढेच महत्त्वपूर्ण आहे.

माझ्यासाठीही भारतातील ‘स्वच्छ भारत मोहीम’ ही केवळ आपले पर्यावरण स्वच्छ करण्याचा कार्यक्रम नाही, तर हा आपण कसा विचार करतो, राहतो आणि काम करतो त्यात बदल घडवण्याचा कार्यक्रम आहे.

दर्जा, क्षमता आणि निर्मिती हे केवळ तांत्रिक मोजमाप नाही, तर ही मनाची आणि जगण्याची स्थितीही आहे.

माझ्या मार्चमधल्या सिंगापूर भेटीच्या वेळी आणि भारतात पाळलेल्या एकदिवसीय शोकाच्या माध्यमातून आम्हाला एका सच्च्या मित्राचा आणि एका खास नात्याचा सन्मान करायचा होता.

सिंगापूर हे असं राष्ट्र आहे जे स्वप्न सत्यात उतरवण्याचे रुपक बनले आहे.
सिंगापूरने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या.

देशाचे आकारमान हे त्याच्या कामगिरीसाठी अडथळा ठरू शकत नाही.
तसंच प्रेरणा, संकल्पना आणि शोध यासाठी साधन संपत्तीची कमतरता ही आडकाठी ठरू शकत नाही.

जेव्हा एखादे राष्ट्र वैविध्याचा स्वीकार करते, तेवहा ते समान कार्यामागे एकत्रित येऊ शकतात.

आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व हे विचारांच्या शक्तीतून घडते, केवळ शक्तीच्या पारंपरिक संकल्पनांतून नाही.

एका पिढीच्या कार्यकाळात देशाला समृध्दीच्या अत्युच्च स्तरावर नेऊन ठेवण्यापेक्षा, सिंगापूरने आणखी बरेच काही साध्य केले आहे.

सिंगापूर विभागातील प्रगतीची प्रेरणा ठरलं आहे आणि या विभागाच्या एकात्मतेसाठीचे नेतृत्त्वही ठरले आहे.

विकासाची शक्यता ही आपल्या क्षितिजाच्या आतच आहे आणि ही केवळ न दिसणारी आणि दूर असणारी आशा नाही यावर त्यांनी इतरांना विश्वास ठेवायला लावला.

सिंगापूरचे यश हे केवळ आकड्यांचे एकत्रिकरण आणि गुंतवणुकीच्या आकारातून साध्य झालेले नाही.

मानव संसाधनांचा दर्जा, लोकांचा विश्वास आणि एका देशाचा निश्चय ही या यशाची गुरुकिल्ली आहे असे मी मानतो.

उपस्थित मान्यवर,

याच दृष्टीकोनातून आम्ही भारताच्या स्थित्यंतराचा पाठपुरावा करत आहोत.

लोक हा आमच्या प्रयत्नांचा उद्देश आहे आणि तेच बदलामार्गाला शक्ती ठरतील.

मी आमच्या यशाचं मोजमाप हे केवळ आकडेवारीवरून जोखत नाही तर लोकांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यावरून करतो.

लोकांचे सक्षमीकरण हा आमच्या धोरणांचा एक भाग आहे.
उद्योगांना चालना मिळेल, संधी विस्तारतील आणि आमच्या नागरिकांमधील क्षमतेचा वापर होईल यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणे हा धोरणाचा दुसरा भाग आहे.

आणि कौशल्य आणि शिक्षण, बालिकांवर विशेष लक्ष, आर्थिक समावेश, शाश्वत निवासस्थान, स्वच्छ नद्या आणि स्मार्ट शहर आणि आमच्या सर्व नागरिकांच्या पाणी आणि स्वच्छतेपासून ऊर्जा ते गृहनिर्माण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या कामातून आम्ही आमच्या नागरिकांमध्ये गुंतवणूक करतो आहेत. आम्ही असे पोषक वातावरण निर्माण करू जिथे प्रत्येक नागरिकांचा सहभाग असेल, त्यांचे हक्क अबाधित असतील आणि मिळणाऱ्या संधीबाबत त्यांना पूर्ण आत्मविश्वास असेल.

आणि आमच्या कायद्यांमध्ये, नियमांमध्ये, धोरणे, प्रक्रिया आणि संस्थामध्ये बदल घडवून संधी निर्माण करतो आहोत तसंच आम्ही राज्य सरकारांबरोबर काम करण्याच्या पध्दतीतही बदल करत आहोत.

बदलाच्या या सॉफ्टवेअरसोबतच आम्ही विकासाचे हार्डवेअरही उभारत आहोत ज्यात भविष्यातील पायाभूत सुविधा, निर्मिती क्षेत्राचे पुनरुज्जीवन, सुधारीत कृषी क्षेत्र, सुलभ व्यापार आणि स्मार्ट सेवा क्षेत्र यांचा समावेश आहे. त्यामुळे आम्ही एकाचवेळी अनेक आघाड्यांवर मार्गक्रमण करतो आहेात आणि या कड्यांमुळेच सर्वंकष धोरण तयार होते हे ही आम्ही जाणून आहोत.सिंगापूरवासियांना भारताबद्दल सखोल माहिती आहे, हे मला माहित आहे.

जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या उदयापेक्षा माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे ते विकासाची चक्रं फिरू लागली आहेत, आत्मविश्वास वाढीला लागला आहे, निश्चय अधिक मजबूत झालाय आणि दिशा साफ झाल्या आहेत.

आणि आता याचा सर्व देशभर प्रसार होऊ लागला आहे. अगदी दुर्गम खेड्यात आणि अगदी तळागाळातील नागरिकही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ लागले आहे.

मान्यवर अतिथी, जीवन प्रवासाच्या अनेक टप्प्यांवर भारत आणि सिंगापूर एकत्र आले आहेत.

आमचे संबंध हे इतिहासाच्या पानांवर लिहिले गेले आहेत, संस्कृतीच्या पाऊलखुणांमध्ये उमटले आहेत, नात्यांच्या बंधनात गुंफले आहेत आणि व्यापाराच्या प्राचीन संबंधातही आहेत. स्वातंत्र्याच्या उष:काली आम्ही मैत्रीच्या धाग्यांनी बांधलेले होतो आणि आशा-आकांक्षामध्येही आम्ही भागीदार आहोत. सिंगापूरची यशोगाथा भारतीयांसाठी प्रेरणा ठरली आहे आणि त्याचवेळी भारत हा शांततामय, संतुलित आणि स्थिर जगासाठी एक आशा बनले आहे.

भारताने खुले धोरण स्वीकारल्यानंतर सिंगापूर भारतासाठी पूर्वेचे प्रवेशद्वार ठरले.

महामहीम ज्येष्ठ मंत्री गोह चोक तांग यांच्या इतके इतर कुणीही काम केलेले नाहीत आणि त्यामुळे ते इतरांपेक्षा अधिक प्रशंसनीय आहेत. त्यांनी भारताची नाळ सिंगापूरशी आणि या विभागाशी पुन्हा एकदा जोडली. त्यांनीच इथल्या प्रचंड क्षमतेचं दर्शन मला घडवलं.

आज सिंगापूर हा जगातला आमचा महत्त्वपूर्ण भागीदार आहे. आमचे नातेसंबंध हे धोरणात्मक आणि बहुआयामी आहेत. आमच्यात संरक्षण आणि सुरक्षा विषयक सर्वंकष संबंध आहेत. आमच्यातील समान दृष्टीकोन आणि समान हित यातून सामोरे येते. सिंगापूर आणि भारत नियमित सराव करतात.

सिंगापूर हे भारतासाठी जगातील गुंतवणुकीचा उत्तम स्रोत आणि ठिकाण आहे. सिंगापूर हे भारताशी सर्वाधिक जोडले गेलेले राष्ट्र आहे. दक्षिण आशियातील व्यापार विषयक सर्वात मोठा भागीदार आहे आणि पर्यटक तसंच विद्यार्थ्यांसाठीचे आवडते ठिकाण आहे. जेव्हा आम्ही आमच्या स्वप्नातल्या भारताची निर्मिती करत आहोत, तेव्हा सिंगापूर या मधला आमचा मोठा भागीदार ठरत आहे. जसे जागतिक दर्जाचे मानव संसाधन, स्मार्ट शहरे, स्वच्छ ऊर्जा किंवा भावी काळातील शाश्वत पायाभूत सुविधा असोत. बेंगळुरूमधल्या पहिल्या माहिती तंत्रज्ञान पार्कपासून सुरू झालेल्या प्रवासात आता अमरावती या आंध्रप्रदेशाच्या नव्या राजधानीचा समावेश झाला आहे.

आमच्या अर्थव्यवस्था विकसित होतील त्याप्रमाणे आमच्या भागीदारीचा अधिक विस्तार होईल आणि व्यापार तसंच गुंतवणुकीच्या आराखड्यात अधिक सुधारणा होईल.
विपरित परिस्थितीवर मात करण्याच्या सिंगापूरच्या यशामुळे 21 व्या शतकातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मला मार्ग सापडला आहे. या आव्हानांमध्ये अन्न आणि पाणी ते स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत निवासस्थान यांचा अंतर्भाव आहे.

आणि अनेक बाबतीत या शतकातील आपल्या विभागाच्या वाटचालीवरही सिंगापूरचा प्रभाव राहील.

महामहीम पंतप्रधान, मान्यवर सदस्य,

या विभागात आशिया पॅसिफिक आणि हिंदी महासागर विभागाच्या अर्धवर्तुळाकार भागाचा (कमानीचा) समावेश होतो. जुळलेला इतिहास आणि परस्परांशी जुळलेली नशीबं वा भाग्य हेच यातून सामोरे येते.

हेस्वातंत्र्य आणि समृध्दीच्या विस्ताराचे क्षेत्र आहे. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांचे सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वाधिक बुध्दीमान आणि कष्टाळू लोकांचे हे घर आहेत. आशियाचा पुनरुत्थान ही सध्याच्या युगातली सर्वाधिक अभूतपूर्व घटना आहे.

गेल्या शतकातल्या मध्याील अंध:कारातून, जपाननं आशियाच्या उत्थानाचे नेतृत्व केले. त्यानंतर विकासाच्या या गतीचा दक्षिण पूर्व आशिया, कोरिया, आणि चीनमध्ये विस्तार झाला.

आणि आता भारत हा आशियाच्या गतिमानतेसाठी आणि समृध्दीसाठी आशेचा किरण बनला आहे. परंतु हे एक असे क्षेत्र आहे जिथे प्रतिस्पर्धी दावे व वादग्रस्त प्रमाणके आणि लष्करी सत्तेचा विस्तार, दहशतवादाचे वाढते सावट तसेच सागरी अनिश्चितता आणि सायबर स्पेसमधील असुरक्षिततेसंदर्भात अनेक अनुत्तरीत प्रश्न आणि न मिटणारे संघर्ष सुरू आहेत.

हे क्षेत्र केवळ अथांग सागरातील एक भूमीचा तुकडा नसून संपूर्ण विश्वाचा प्रभाव असलेले आणि त्याच्यासोबत जोडले गेलेले एक क्षेत्र आहे.

आम्ही सुध्दा एक असा देश आहोत ज्यांच्या राज्याराज्यांमध्ये विविधता आहे, जिथे आवास, अन्न आणि पाण्याचा प्रश्न आहे, जिथे निसर्गाचं देणं आणि परंपरेच्या संपत्तीच्या सहाय्याने आम्ही प्रगतीच्या दिशेने भरधाव वाटचाल करत आहोत परंतु असे असले तरीही आमच्या कृषी आणि भूमीला हवामान बदलाची भीती सतत भेडसावत आहे.

इतिहासात अनेक वेळा विविध टप्प्यांवर आशियाने हे सर्व अनुभवलं आहे परंतु याआधी बहुधा याचा अनुभव येथे आला नव्हता आणि आशिया अजूनही विविध मार्गांच्या सहाय्याने शांततापूर्ण, स्थिर आणि संपन्न भविष्याचा ठाव घेत आहे.

हा प्रवास यशस्वी झालाच पाहिजे.

आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिंगापूर आणि भारताने एकत्रित काम केले पाहिजे.

भारताचा इतिहास हा आशियापासून अविभाज्य आहे.

आणि आता, जेव्हा आपण आशियाच्या अधिक समीप येत आहोत आपण पुन्हा एकदा इतिहासात परत जात आहोत. आपण आपल्या प्राचीन संबंधांच्या नैसर्गिक सहजप्रवृत्तीसह आपले प्राचीन सागरी आणि भूमार्ग याकडे जात आहोत.

आणि, मागील अठरा महिन्यांच्या कालावधीमध्ये माझे सरकार या क्षेत्राकडे जगातील इतर कोणाहीपेक्षा अधिक लक्ष देत आहे.

पॅसिफिक देशांची द्वारे उघडल्याने, ऑस्ट्रेलिया आणि मंगोलियाचे संबंध चीन, जापान, कोरिया आणि आसियान सदस्यांसोबत अधिक दृढ होत आहेत, त्यामुळे आपण आपले लक्ष्य प्रयोजनासह अनुसरले पाहिजे.

भारत आणि चीनची सीमारेषा एकत्र आहे. भिक्कू आणि व्यापारी आपले संबंध दृढ करतात आणि समाजाला समृध्द करतात.

हा इतिहास हुॲन सँगच्या सातव्या शतकातील यात्रेतून प्रतिबिंबित होतो. आणि मला माझे जन्म स्थळ गुजरात चीनमधील जिआन या स्थळांना जोडण्याचे भाग्य मिळाले जिथे या मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष शी यांनी माझे स्वागत केले होते.

संस्कृत, पाली आणि चीनी भाषेत लिहिलेल्या धार्मिक साहित्यात आपण पाहिले की, भूतकाळात स्नेहपूर्वक आणि उदारतापूर्ण पध्दतीने शब्दांची देवाणघेवाण करण्यात आली आहे. भारतातील प्रसिध्द तानचोई साडी आणि सिनापत्तामधील संस्कृत नाव सिल्क हे याचे उत्तम उदाहरण आहे.

आज दोन्ही देशांची लोकसंख्या ही जगाच्या दोन पंचमांश आहे आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था या जगातील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. चीनचे आर्थिक स्थित्यंतर हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.

आणि चीन आपली अर्थव्यवस्था पुर्नसंतुलित करत आहे आणि भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याने आपण दोघांनी आपली प्रगती मजबूत करायला हवी. तसेच आपण आपल्या प्रदेशासाठी प्रगत स्थैर्य आणि भरभराट प्रदान केली पाहिजे.

आणि आपण एकत्रितपणे व्यापार, हवामान बदल यासारख्या जागतिक स्तरावरील समान आव्हानांचा अधिक प्रभावीपणे सामना करू शकतो.

सीमा प्रश्नासह आपल्याकडे आपले अनेक न सुटलेले मुद्दे आहेत पण असे असूनही आपण आपल्या सीमा क्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित केली आहे. आपला धोरणात्मक संवाद बळकट करण्यामध्ये दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. दहशतवादासारख्या समान आव्‍हानाचा सामना करताना आपण आपल्या आर्थिक संधीची देखील देवाणघेवाण केली आहे.

आपले हित आणि जबाबदारी याप्रती जागरुक असलेले भारत आणि चीन हे दोन्ही देश त्यांच्या संबंधातील गुंतागुंतीच्या पलिकडे जाऊन विधायक कामे करण्यासाठी एकत्रित येतील.

सध्या वैश्विक आर्थिक सुकाणू चीनकडे असल्याने प्रगत जागतिक आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्यासाठी संपूर्ण जग चीनकडे आशेने पाहत आहे.

भारत आणि जपानचे संबंध थोडे उशीरा प्रस्थापित झाले. परंतु माझे मित्र पंतप्रधान अबे यांनी मला पूर्वकालीन अध्यात्मिक संबंधाचे प्रतीक असलेले क्योटोचे उत्कृष्ट पवित्र स्थान दाखविले.

आणि, शंभरवर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद जपानच्या भूमीत दाखल झाले होते आणि त्यांनी भारतीय युवकांना पूर्व जपानमध्ये जाण्याची आग्रहाची विनंती केली.

स्वतंत्र भारताने त्या सल्ल्याचे गांभीर्याने पालन केले. अशा काही भागीदारी आहेत ज्या जपान सोबतच्या आपल्या संबंधांमुळे भारतात त्यांना उत्तम मानसन्मान मिळत आहे.

भारताच्या आधुनिकीकरणामध्ये आणि प्रगतीमध्ये जपान इतके योगदान कोणीच दिलेले नाही याची उत्तम उदाहरणे म्हणजे कार, मेट्रो आणि इंडस्ट्रीयल पार्क आणि भारताच्या स्थित्यंतरामध्ये एक भागीदार म्हणून जपान इतकी महत्त्वपूर्ण भूमिका कोणीही बजावलेली नाही.

आता आपण अजून एकत्र आलो आहोत. या सगळ्याकडे आपण एक धोरणात्मक भागीदारी म्हणून पाहत आहोत जी आशिया, प्रशांत आणि हिंद महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य आणण्यात महत्त्वपूर्ण आहे.

कोरीया आणि ऑस्ट्रेलिया सोबतच्या आपल्या संबंधांची सुरुवात बळकट आर्थिक पायाभरणीने झाली आहे.

आसियान प्रदेश ॲक्ट ईस्ट पॉलिसीची धुरा सांभाळणारे आहेत. आपण भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या एकत्र जोडले गेलो आहोत. आपल्या अनेक समान आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत आणि आपल्या समान आकांक्षांनी आपले बंध जुळले आहेत.

प्रत्येक आसियान सदस्यासोबत आपले राजकीय, संरक्षण, लष्कर आणि आर्थिक बंध सखोल होत आहेत आणि आसियान समुदाय क्षेत्रीय एकात्मतेचे नेतृत्व करत असलयाने भारत आणि आसियान देशांमध्ये चैतन्यपूर्ण भागीदारीला भरपूर वाव आहे.

जवळजवळ सर्वच प्रदेशांसोबत भारताने आर्थिक सहकार्याचा आराखडा तयार केला आहे. आपल्याला क्षेत्रीय अर्थव्यवस्थेसोबत सखोल एकात्मतेची आवश्यकता आहे आणि आपण आपला भागीदारी करार अद्ययावत करायला हवा आणि क्षेत्रीय सर्वसमावेश आर्थिक भागीदारी करारावर लवकरच काहीतरी तोडगा काढायला हवा.

आपली सामूहिक वागणूक निश्चित करणाऱ्या नियम व अटी निश्चित करून त्यांना बळकटी प्रदान करणे हे सध्या सर्वात मोठे आव्हान या सर्व क्षेत्रांसमोर आहे.

आणि म्हणूनच सहकार्यात्मक आणि सहयोगात्मक भविष्याच्या उभारणीसाठी आपण सर्व पूर्व आशिया शिखर परिषदेत एकत्र आले पाहिजे.

सागर, अंतराळ आणि सायबर ही आपल्या भरभराटीचीक्षेत्र बनावीत यासाठी भारत पूर्व आशिया शिखर परिषदेतील सदस्यांबरोबरच अमेरिका आणि रशियासोबत काम करेल. सर्वांच्या हितासाठी सागरी क्षेत्र सुरक्षित आणि खुले ठेवण्यासाठी भारत आपली सर्व शक्ती पणाला लावेल.

हे अंतर अवलंबित्व युग आहे, जिथे या शतकाचे वचन लक्षात घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि हे आपण केलेच पाहिजे कारण आपली आव्हाने समान आहेत.

दहशतवाद हे असेच जागतिक आव्हान आहे जे संपूर्ण समुदायाला प्रभावित करत आहे. दहशतवादाचे सावट संपूर्ण जगावर पसरत आहे. दहशतवाद फक्त लोकांचा प्राणच घेत नाही तर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था देखील कोलमडून टाकतो.

संपूर्ण जगाने एक स्वरात बोलणे आणि एक कृती करणे आवश्यक आहे. आपल्याकडे राजकीय, कायदेशीर, लष्करी आणि गुप्तचर प्रयत्न सुरू आहेत परंतु आपल्याला अजून प्रयत्न करायला हवेत.

दहशतवाद्यांना अभय देणाऱ्या, त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि शस्त्रास्त्र आणि निधी पुरवणाऱ्या देशांना जबाबदार धरले पाहिजे.

देशांनी एकमेकांना अधिक सहकार्य करायला हवे. आपण दहशतवादाला धर्मांसोबत जोडायला नको आणि मानवी मूल्य आणि विश्वास ठामपणे मांडणे गरजेचे आहे.

पॅरिसमधील संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला काही दिवसच उरले आहेत तिथे आपल्याला संयुक्त राष्ट्र आराखड्याच्या संकेत तत्त्वांच्या आधारे हवामान बदलावर ठोस उपाय साध्य केले पाहिजे. आपल्या सारख्या छोट्या राष्ट्रांकरीता हे विशेष महत्त्वाचे आहे.

आपला प्रदेश हा प्रचंड संधींचा आहे.

आणि त्यामुळेच आपलं आशिया शतकाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण कठोर परिश्रम करायला हवेत.

आशियाकडे प्राचीन संस्कृतीचे ज्ञान आणि जगातील सर्व महान धर्म आहेत. तसेच युवा ऊर्जा आहे.

शतकापूर्वी जेव्हा आशियाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांनी जेव्हा या क्षेत्राचा दौरा केला तेव्हा त्यांनी असे भविष्य वर्तवले होते की, आशिया स्वत:साठीच पूनर्चेतना मिळवेल.

येथे सिंगापूर मध्ये जिथे सर्व देश एकत्र आले आहेत विविधता एकत्र आल्या आहेत, सर्वांच्या कल्पना एकत्रित येऊन आशेची भरारी घेतली असताना मला असे वाटते की आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत लवकरच पोहचू.

आणि भारताने आपले स्थित्यंतर स्विकारून शांत आणि स्थैर्य जगासाठी प्रयत्न सुरू केले असताना सिंगापूर हा या प्रवासातील प्रमुख भागीदार ठरेल.

धन्यवाद!

J. Patankar/S. Mhatre/S.Tupe/N.Sapre