Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा केली.

उभय नेत्यांनी भारत-नेदरलँड्स द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.  पाण्यासंबंधित धोरणात्मक भागीदारी, कृषी क्षेत्रातील सहकार्य, उच्च तंत्रज्ञान आणि नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य यांचा यात समावेश होता. भारत-युरोपीय संघ संबंध, हिंद-प्रशांत क्षेत्रातील अभिसरण आणि सहकार्यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारविनिमय केला.

नियमित उच्चस्तरीय भेटी आणि संवादांमुळे, भारत-नेदरलँड संबंधांना नजीकच्या काही वर्षांत प्रचंड गती मिळाली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी 09 एप्रिल 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषद आयोजित केली होती. दरम्यान नियमितपणे संवादही  सुरूच होता. या परिषदेदरम्यान नेदरलँडसोबत पाण्या संबंधित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ  करण्यात आला.

भारत आणि नेदरलँड्स यंदा संयुक्तपणे राजनैतिक संबंधांची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. हा मैलाचा टप्पा असून त्यानिमित्त 4 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत भारताच्या राष्ट्रपतींनी नेदरलँडला भेट दिली आणि उभय देशांनी तो साजरा केला.

***

S.Kakade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com