Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात जी-20 शिखर परिषदेदरम्यान बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात जी-20 शिखर परिषदेदरम्यान बैठक


इटलीची राजधानी रोम इथे होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी द्वीपक्षीय चर्चा झाली. 

भारत-फ्रान्स यांच्यातील व्यापक सामरिक भागीदारीच्या सद्यस्थितीविषयी दोन्ही नेत्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले. 

तसेच, युरोपीय महासंघाने  सप्टेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या हिंद-प्रशांत धोरणाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. या धोरणात फ्रान्सच्या नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी मॅक्रॉन यांचे आभारही मानले. हिंद-प्रशांत धोरणात परस्पर सहकार्य करण्याविषयीची कटीबद्धता दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. तसेच, या संपूर्ण प्रदेशात मुक्त, खुली आणि नियम-आधारित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नवे अभिनव मार्ग शोधण्यावर या चर्चेत सहमती व्यक्त झाली. 

आगामी कोप 26 आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठीची आर्थिक तरतूद, याबद्दल उभय नेत्यांनी चर्चा केली. 

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी लवकरात लवकर भारतात यावे, असे आमंत्रण मोदी यांनी यावेळी दिले. 

 

 

 

****

MC/Radhika/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com