नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांच्यादरम्यान 21 डिसेंबर 2020 रोजी आभासी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
परिषदेदरम्यान, दोन्ही नेते सविस्तर द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरील विचारांची देवाणघेवाण करतील आणि भारत-व्हिएतनाम व्यापक सामरिक भागीदारीच्या भावी विकासासाठी मार्गदर्शन करतील.
2020 मध्ये, दोन्ही देशांदरम्यान उच्च-स्तरीय देवाणघेवाण सुरु होती. व्हिएतनामचे उपराष्ट्रपती डांग थी नोगोक थिन फेब्रुवारी 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. तसेच, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान 13 एप्रिल 2020 रोजी कोविड-19 महामारी उद्रेकासंदर्भात दूरध्वनी संवाद झाला होता. 25 ऑगस्ट 2020 रोजी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सह-अध्यक्षतेखाली संयुक्त आयोग बैठक (जॉईन्ट कमिशन मिटींग) आभासी पद्धतीने पार पडली होती. 27 नोव्हेंबर 2020 रोजी संरक्षणमंत्र्यांची व्हिएतनामच्या संरक्षमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक झाली.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com