नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर महामहीम शेख तमिम बिन हमद अल-थानी यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला .
पंतप्रधान मोदी यांनी कतारच्या आगामी राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने अमीर महामहीम शेख तमिम बिन हमद अल-थानी यांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आभार व्यक्त करताना, अमीर यांनी कतारमध्ये स्थायिक झालेले भारतीय कतारच्या राष्ट्रीय दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ज्या उत्साहाने सहभागी होतात त्याचे कौतुक केले. त्यांनी पंतप्रधानांना, नुकत्याच होऊन गेलेल्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दोन्ही नेत्यांनी गुंतवणुकीचा ओघ आणि उर्जा संरक्षणाबाबत भारत आणि कतारदरम्यान असलेल्या मजबूत सहकार्य संबंधाबाबत चर्चा केली आणि हे सहकार्य वाढविण्यासाठी नुकत्याच झालेल्या सकारात्मक घडामोडींचा आढावा घेतला. कतार गुंतवणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी विशेष कृती दल निर्माण करायचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. तसेच भारतातील एकूण उर्जा विषयक मूल्य साखळीत कतारची जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठीचे मार्ग शोधण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.
उभय नेत्यांनी भविष्यात एकमेकांच्या नियमितपणे संपर्कात राहण्याचे मान्य करत, कोविड- 19 ने निर्माण केलेली आरोग्यविषयक धोकादायक परिस्थिती निवळल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
Jaydevi P.S./S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Had a very pleasant conversation with my good friend @TamimBinHamad. Conveyed greetings for Qatar's forthcoming National Day. Qatar is a vital pillar of India's energy security and a valued source of FDI. We agreed to deepen our cooperation in all areas.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2020