Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे युवराज शेख महमद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचे सरकार आणि जनतेला ईद उल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.

कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत दोन्ही देशादरम्यानच्या प्रभावी सहकार्याबद्दल या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. युएई मधल्या भारतीय नागरिकांना सहाय्य देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी युवराजांचे आभार मानले.

युवराज,राजघराणे आणि युएईतल्या जनतेच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane