अॅम्फन चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या नुकसानीबद्दल ऑस्ट्रियाच्या अध्यक्षांनी दु: ख व्यक्त केले. कोविड -19 महामारीमुळे आरोग्यावर तसेच आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपापल्या देशांमधील उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना माहिती दिली. सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी सहमती दर्शविली.
दोन्ही नेत्यांनी कोविडनंतरच्या जगात भारत-ऑस्ट्रिया संबंध अधिक दृढ आणि वैविध्यपूर्ण बनवण्याच्या सामायिक इच्छेचा पुनरुच्चार केला. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यता, एसएमई इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या संधी पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या.
पर्यावरणाच्या आरोग्यासारख्या दीर्घकालीन समस्येवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी सध्याच्या आरोग्य संकटांतून जग लवकरच सावरेल अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
Had a good discussion with President @vanderbellen about the measures adopted by India and Austria to respond to COVID-19. We agreed on the potential to expand India-Austia cooperation in many areas, as both our countries prepare for the post-COVID world.
— Narendra Modi (@narendramodi) May 26, 2020