पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशाच्या जनतेला ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या.
अम्फान या चक्रीवादळामुळे उभय देशात झालेल्या नुकसानाचा आढावा त्यांनी परस्परांना दिला. कोविड महामारीबाबत परिस्थितीबाबत आणि या संदर्भात दोन्ही देशातले सहकार्य याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताच्या सहकार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशाची जनता यांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Spoke to PM Sheikh Hasina to wish her and the friendly people of Bangladesh, a happy & prosperous Eid-ul-Fitr. We discussed the impact of cyclone Amphan and the present COVID-19 situation. Reiterated India’s continued support to Bangladesh in this challenging time.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2020