Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

कोविड-19 महामारी संदर्भात भारत आणि युरोपियन महासंघ यामधली परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत दोन्‍ही नेत्यांनी चर्चा केली. या महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषध उत्पादन पुरवठ्यासह परस्पर सहकार्य वृद्धिंगत झाल्याची या नेत्यांनी प्रशंसा केली.

कोविड-19 चा आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य महत्वाचे असल्याचे या नेत्यांनी मान्य केले.

भारत-युरोपियन महासंघ यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासाठीच्या कटिबद्धतेचा उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला. भारत-युरोपियन महासंघ यांच्यातल्या पुढच्या बैठकीसाठी विषय पत्रिका निश्चित करण्यासाठी उभय अधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याला या नेत्यांनी मान्यता दिली.

या संकटामुळे समोर येणाऱ्या पैलूंबाबत आणि कोविड नंतरच्या परिस्थिती संदर्भात परस्परांच्या संपर्कात राहण्यावर या नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

 

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane