पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संभाषण झाले.
कोविड-19 संदर्भातल्या सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली. जागतिक ऐक्य आणि सहकार्य,पुरवठा साखळी अबाधित राखणे आणि सहकार्यात्मक संशोधन कार्याचे महत्व यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.
कॅनडात असलेल्या भारतीयांना विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना सहाय्य करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कॅनडाच्या पंतप्रधानांचे आभार मानले. भारतात असलेल्या कॅनडाच्या नागरिकांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा करत पंतप्रधान त्रुडो यांनी भारत सरकारचे आभार मानले.
औषध निर्मिती क्षेत्रातली भारताची उत्पादन क्षमता कॅनडासह जगभरातल्या नागरिकांच्या सहाय्यासाठी उपलब्ध राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
या महामारीविरोधातल्या लढ्यासाठीच्या जागतिक प्रयत्नात, विशेषतः कोविड-19 वर लस किंवा उपचारात्मक पद्धती शोधण्यासाठी, संशोधन आणि तंत्रज्ञानातल्या सहकार्याद्वारे भारत आणि कॅनडा यांच्यातली भागीदारी अर्थपूर्ण योगदान देईल असे मत या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.
B.Gokhale/ N.Chitale/P.Kor
Had a warm exchange with PM @JustinTrudeau. Thanked him for looking after Indian citizens in Canada in these difficult times. Collaboration and partnership between India and Canada is vital to fighting the pandemic including through medical research and supply chain management.
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2020