Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

रमजानच्या येत्या पवित्र महिन्यासाठी पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे आणि जॉर्डनच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत आणि कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उभय देशांनी केलेल्या उपाययोजनाबाबत भारत आणि जॉर्डन या दोन्ही देशांच्या नेत्यांनी आज चर्चा केली. या संदर्भात माहिती, उत्तम उपाययोजना यांची देवाण-घेवाण तसेच सुलभ आवश्यक पुरवठा याद्वारे परस्परांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या प्रयत्नांना सहाय्य करण्याला दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली.

जॉर्डनमधे असलेल्या भारतीय नागरिकांना केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनच्या राजांचे आभार मानले.

कोविड-19 संबंधित तसेच इतर प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर दोन्ही देशांनी संबंधित परस्परांच्या संपर्कात राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane