Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांची चंदिगड संग्रहालयाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांची चंदिगड संग्रहालयाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांची चंदिगड संग्रहालयाला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी चंदिगडमधल्या सरकारी वस्तुसंग्रहालय आणि आर्ट गॅलरीला भेट दिली.

2.6 दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाचा वावर दर्शविणाऱ्या आणि हिमालयाच्या पायथ्याशी पुरातत्व खात्याला सापडलेल्या अवशेषंची पाहणीही उभय नेत्यांनी केली. मानवी अस्तित्वाचे हे सर्वात प्राचीन ज्ञात अवशेष मानले जातात.

फ्रान्सच्या राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयाचा प्रागेतिहास विभाग आणि चंदिगडच्या पुरातत्व आणि मानव वंशशास्त्र संशोधन सोसायटी यांचे सात वर्षांचे व्यापक संशोधन आणि सहकार्याचा हा परिपाक आहे. भारताची पुरातत्व आणि मानव वंशशास्त्र संशोधन सोसायटी आणि फ्रान्सचे राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय यांच्यात याबाबत करार झाला होता.

चंदिगडजवळच्या मसोल भागातल्या 50 एकर जमिनीवर विविध ठिकाणाहून सापडलेली 200 क्वार्टजाइट अवजारे आणि 1500 जीवाश्म अवशेष या पुरातत्व शोधादरम्यान सापडले आहेत. पेलेवॉल आढाव्यात लेखांच्या रुपात या शोधाशी संबंधित संशोधन कार्य प्रकाशित करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी भारत-फ्रान्सच्या टीमचे संयुक्त संशोधन कार्याबद्दल अभिनंदन केले.

उभय देशातले दीर्घकालीन सांस्कृतिक संबंध, बहुमोल संस्कृती जतन आणि वृद्धींगत करण्यासाठी सफल द्विपक्षीय सहकार्याचे हे यशस्वी उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा शोधांमुळे भविष्यात संयुक्त प्रयत्नांना आणखी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

N. Chitale /I. Jhala / M. Desai