पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत तसेच या संकट काळात, दोन्ही नेत्यांनी, आपल्या देशाने उचललेल्या पावलांविषयी चर्चा केली.
सध्याच्या संकट काळात, या दोनही देशात परस्परांच्या नगरीकांना मिळत असलेले सहाय्य आणि सुविधांबाबत प्रशंसा व्यक्त करत हे सहकार्य असेच राखण्याला उभय नेत्यांनी मान्यता दर्शवली.
या महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याकरिता मार्ग दाखवण्यासाठी भारत-जपान भागीदारी,महत्वाची भूमिका बजावू शकेल यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane