Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईच्या युवराजांची नवी दिल्लीत भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईच्या युवराजांची नवी दिल्लीत भेट


नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज महामहिम शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची भेट घेतली.  पंतप्रधानांनी यावेळी भारत – संयुक्त अरब अमिराती   मधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती  यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सर्वसमावेशक करण्यात दुबईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :

“दुबईचे युवराज महामहिम शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना भेटून आनंद झाला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सर्वसमावेशक करण्यात दुबईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या विशेष भेटीमुळे दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेली घनिष्ठ मैत्री अधिक दृढ होऊन भविष्यात आणखी मजबूत सहकार्याचा मार्ग  खुला होईल.

@HamdanMohammed”

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai