Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिका, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना तर ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, यांची न्यूयॉर्क इथे भेट घेतली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसीओ ओलांद आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांची पंतप्रधानांनी भेट घेतली.

हवामान बदल, दहशतवाद, चार निर्यात नियामकांच्या सदस्यत्वाची भारताची आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणा या चार मुद्दयांवर चर्चेचा प्रामुख्याने रोख राहिला.

हवामान बदलाविषयी भारताची कटिबध्दता इतर कोणत्याही देशापेक्षा कमी नाही असं ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. इंटेंडेड नॅशनली डिटरमाईन्ड कॉन्ट्रीब्युशन अर्थात राष्ट्रानं निर्धारीत केलेलं योगदान जाहीर करण्यासाठी 1 ऑक्टोबर पर्यंत मुदत असली तरी हे योगदान 2 ऑक्टोबरला म्हणजे गांधी जयंती दिनी जाहीर करण्याची परवानगी भारतानं मागितली आहे. केवळ उत्सर्जन मर्यादेवर भर देऊन चालणार नाही तर स्वच्छ ऊर्जेसाठी विकसनशील देशांना वित्त आणि तंत्रज्ञानही पुरवण्यावर भर द्यायला हवा असं पंतप्रधान म्हणाले. 175 गिगावॅट नवीकरणीय उर्जा उत्पादन साध्य करण्याचे भारताचे उद्दीष्टही त्यांनी विषद केले.

मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांच्यासमवेत झालेल्या भेटी दरम्यान केलं. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांसीओ ओलांद यांच्यासमवेत झालेल्या चर्चेच्यावेळी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस्‌ही सहभागी झाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान उभय देशांच्या संबंधात झालेल्या लक्षणीय प्रगतीची दखल घेण्यात आली. धोरणात्मक आणि वाणिज्यिक विषयांवर नुकताच झालेला संवाद तसंच ऊर्जा आणि सायबर सुरक्षा या मुद्यांचाही आढावा घेण्यात आला. इस्रोनं चार अमेरिकी उपग्रह अवकाशात सोडले त्याच दिवशी ही भेट झाल्याचं यावेळी नमूद करण्यात आले. कॅलिफोर्नियाला दिलेली भेट, नवीकरणीय ऊर्जा संवाद तसंच सॅन होजे येथे झालेल्या स्टार्ट अप कनेक्ट उपक्रमाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

N. Chitale/S.Tupe