Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान-किसान योजने अंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी आधार-संबंधित अटी शिथिल करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी ही नवीन केंद्रीय योजना सुरु केली आहे. देशभरात 2 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या सर्व छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी वार्षिक 6000 रुपये सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. माननीय पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारी, 2019 रोजी या योजनेचा शुभारंभ केला आहे. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. पहिल्या हप्त्यात देशभरातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच पहिला हप्ता दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत 1 एप्रिल, 2019 नंतर 2 रा हप्ता मंजूर होईल. या संबंधात, केंद्रीय मंत्रिमंडळाने 1.2.2019 रोजी योजना मंजूर करताना सांगितले की, दुसरा हप्ता जारी करण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे. मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी 100 % आधार संलग्न बँक खाती मिळविणे कठीण होणार आहे, कारण आधारधारकांच्या तपशीलांचे बायो-मेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे. लाभार्थींचा आधार क्रमांक असणा-या व्यक्तींची माहिती घेतली नाही तर 2 एप्रिल 2019 रोजी दुसऱ्या हप्त्याला विलंब होईल आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यामुळे, ही अट शिथिल करण्यात आली आहे. तिसऱ्या हप्त्यासाठी मात्र ही अट लागू असेल. मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असेल. ही रक्कम देण्यापूर्वी माहितीची वैधता तपासण्याबाबत सरकार योग्य उपाययोजना करेल.

B.Gokhale/S.Kane/P.Kor