आज लोक कल्याण मार्गावर पंतप्रधान कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘दिवाळी मिलन’ आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या परिश्रम व निरंतर प्रयत्नांमुळे सरकारने केलेले सर्व परिवर्तन कार्य शक्य झाले आहे. मागील वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा घेण्यास आणि येणाऱ्या वर्षात अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आव्हान त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
पंतप्रधान म्हणाले की, पीएम कार्यालय संपूर्ण सरकारसाठी एक आदर्श म्हणून काम करत असून पीएमओ केवळ अंमलबजावणीच करत नाही तर प्रेरणा आणि मार्ग हही दाखवते. पंतप्रधानांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या नैतिकतेने आणि वचनबद्धतेने उर्वरित सरकारसाठी प्रेरणास्थान बनावे असे आवाहन केले. २०२२ मध्ये भारताने स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करतांना सर्व उद्दिष्ट पूर्ण होतील अशी उद्दीष्टे त्यांनी मांडली.
पंतप्रधान म्हणाले की पीएमओने लाखो नागरिकांची स्वप्ने व आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत राहिले पाहिजे.
B.Gokhale/P.Malandkar