Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार


शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

नवी दिल्ली येथील मानेकशॉ सभागृहात आयोजित होणा-या या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांशिवाय, देशातील नऊ राज्यातील विद्यार्थी व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. हा संवाद/चर्चासत्र सकाळी 10 वाजता सुरू होणार असुन सुमारे 90 मिनिटे चालणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान याप्रंसगी डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ एका नाण्याचे अनावरण करणार आहेत. तसेच, कला उत्सव या संकेतस्थळाचे उद्‌घाटन ते करतील. देशातील माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये कलेचे संगोपन करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ‘कला उत्सव’ हा एक उपक्रम आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति जुबिन ईरानी व राज्‍य मंत्री उपेन्‍द्र कुशवाहा, राम शंकर कथेरिया तसेच जयंत सिन्‍हा उपस्थित राहणार आहेत.

D.Wankhede/N.Sapre