Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या वृंदावनमध्ये तीन अब्ज लोकांना पौष्टिक आहार देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील वृंदावनला भेट देतील. वृंदावन चंद्रोदय मंदिर येथे अक्षय पात्र फाऊंडेशन च्या तीन अब्ज मुलांना जेवण पुरविणाऱ्या पॅकचे अनावरण पंतप्रधान बटन दाबून करतील.

त्यानंतर पंतप्रधान विविध शाळांमधून एकत्रित आलेल्या गरीब , वंचित अशा तीन अब्ज मुलांना आहार देतील आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

मोदी इस्कोनचे आचार्य श्रीला प्रभुपाद यांना पुष्पांजली अर्पण करतील.

फाऊंडेशनद्वारे तीन अब्ज मुलांना जेवण सेवा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पार्श्वभूमीः

अक्षय पात्र फाउंडेशनने 19-वर्षांच्या आपल्या प्रवासात बारा राज्यातील 14,702 शाळांच्या 1.76 दशलक्ष मुलांना दुपारचे जेवण दिले आहे. वर्ष 2016 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत अक्षय पात्रने 2 अब्ज संचयी जेवणाची सेवा केली.

लाखो मुलांसाठी गुणवत्ता, स्वच्छता आणि पोषक आहार देण्यासाठी हे फाऊंडेशन मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि राज्य सरकारांसह लक्षपूर्वक कार्य करते.

मिड-डे मील स्कीम हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम मानला जातो. शाळांमध्ये नाव नोंदणी, मुलांची उपस्थिती वाढविणे तसेच 6-14 वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य सुधरविणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

24 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीतील ‘सेल्फ 4 सोसायटी’ ॲप लॉन्च करताना अक्षय पात्र फाऊंडेशनबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. ते म्हणाले, “अक्षय पात्र एक शाळेच्या धर्तीवरील स्टार्टअप आहे, जे शाळेच्या मुलांना अन्न पुरविण्याच्या चळवळीला प्रोत्साहन देत.”

B.Gokhale/P.Malandkar