Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर, “मेक इन इंडिया” सप्ताहाचे उद्या उद्‌घाटन करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत.

नरेंद्र मोदी उद्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात मेक इन इंडिया सेंटरचे उद्‌घाटन करतील. ते या सेंटरला भेट देतील. त्यांच्यासोबत स्वीडनचे पंतप्रधान, फिनलंडचे पंतप्रधान तसेच देशातील आणि परदेशातील अन्य वरिष्ठ मान्यवर असतील. वरिष्ठ परदेशी नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय बैठका घेतील.

वरळीतील एनएससीआय येथील कार्यक्रमात पंतप्रधान “मेक इन इंडिया” सप्ताहाचे अधिकृत उद्‌घाटन करतील. देशातील तसेच परदेशातील वरिष्ठ नेते आणि उद्योग प्रमुखांच्या समुदायाला ते संबोधित करतील.

“मेक इन इंडिया” अभियानाला अधिक चालना देण्यासाठी आणि देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी जगासमोर सादर करण्यासाठी “मेक इन इंडिया” हा सप्ताह महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर पसंतीचे निर्मिती केंद्र म्हणून प्रोत्साहन मिळेल. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय तसेच जागतिक उद्योजक, विद्वान मंडळी, केंद्रीय आणि राज्य प्रशासन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

तत्पूर्वी, उद्या सकाळी मुंबईत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन म्हणून कोनशिलेचे अनावरण करतील. तसेच समुदायाला ते संबोधित देखील करतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai