पंतप्रधान नरेंद्र मोदी उदया बोधगयाचा दौरा करणार आहेत. या दौ-यासोबतच पंतप्रधान महाबोधी मंदिराला भेट देतील, तसेच पवित्र बोधी-वृक्षाचे सुद्धा दर्शन घेतील. “चेतिया करिका: तीर्थयात्रा आणि सत्याचा शोध” यावरील प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधानाचा बोधगयाचा हा दौरा “संघर्ष टाळणे आणि पर्यावरणविषयी जागृती यावरील जागतिक हिंदू-बौद्ध उपक्रमाच्या” तीन-दिवसीय संवाद परिषदेसोबत होत आहे. याचदरम्यान, या परिषदेतील प्रतिनीधी बोधगया येथे उपस्थित राहणार आहेत.
Will join "Samvad"- Global Hindu-Buddhist Initiative in Bodh Gaya. Looking forward to interacting with Buddhist saints, scholars & delegates
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2015