Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमधील शेरे-ए-काश्मिर मैदानावर एका जनसभेला ते संबोधित करतील.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 450 मेगावॅट क्षमतेच्या बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील तसेच चंद्रकोट, रामबन येथील कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग 44 च्या उधमपूर-रामबन आणि रामबन बनिहाल या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करणार आहेत. यावेळी मोदी एका सभेला देखील संबोधित करणार आहेत.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre