Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या चंदीगढ आणि उत्तराखंडला जाणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चंदीगडला भेट देणार आहेत. चंदीगढ विमानतळ येथील नवीन नागरी हवाई टर्मिनलचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पदव्युत्त संस्थेच्या 34 व्या दीक्षांत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत.

नवीन गृहनिर्माण योजनेचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच चंदीगढमध्ये सेक्टर – 25 येथे एका सार्वजनिक सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील.

त्यानंतर उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे स्वामी दयानंद सरस्वती आश्रमाला पंतप्रधान भेट देणार आहेत.

S.Tupe/N.Sapre