पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्हर्च्युअल इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2020 ला 8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10:45 वाजता संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारचा दूरसंवाद विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी याचे आयोजन केले आहे. 8 ते 10 डिसेंबरपर्यंत आयएमसी चालणार आहे.
आयएमसी 2020 विषयी
‘समावेशी नवोन्मेश- अद्ययावत, सुरक्षित, शाश्वत’ अशी आयएमसी 2020 ची संकल्पना आहे. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला तसेच ’डिजिटल समावेशकता’ आणि ‘शाश्वत विकास, उद्योजकता आणि नवोन्मेश’ यांची सांगड घालण्याचा याचा उद्देश आहे.
स्थानिक आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर दुरसंचार आणि नव तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचाही यामागचा उद्देश आहे.
विविध मंत्रालये, दूरसंवाद तसेच जागतिक स्तरावरच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 5 जी संबंधी तज्ज्ञ, कृत्रिम बुद्धीमत्ता ,इंटरनेट ऑफ थिंग, डेटा अॅनालिटिक्स, क्लाऊड अँड एज कॉम्प्यूटिंग, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रातल्या व्यक्ती यात सहभागी होणार आहेत.
***
S.Thakur/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com