Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या आंध्रप्रदेशला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्रप्रदेशला भेट देणार आहेत. आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती शहराच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान तिरुपती विमानतळावरील गरुडा टर्मिनलचे उद्‌घाटन करणार आहेत. तिरुपती मोबाईल निर्मिती केंद्राचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान तिरुमला मंदिरातही जाणार आहेत.

J. Patankar/S.Tupe/N.Sapre