Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या अरुणाचल प्रदेशला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याअरुणाचल प्रदेशला भेट देणार आहेत. इटानगर इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राचे उदघाटन करणार आहेत. या केंद्रात  प्रेक्षागृह , सभागृहआणि  प्रदर्शनगृहअसेल. हे केंद्र  इटानगरची मोठी ओळख ठरेल अशी अपेक्षा आहे.

राज्य नागरी सचिवालयाच्या इमारतीचे लोकार्पणही पंतप्रधान यावेळी करतील. तसेच तोमोरिबाआरोग्य आणि वैद्यकशास्त्र संस्थेतील शैक्षणिक विभागासाठी ते भूमिपूजनही करतील.  अरुणाचल प्रदेशहून पंतप्रधान त्रिपुराच्या अनौपचारिक दौऱ्यावर जातील.

B.Gokhale/ S.Kakade