Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ


नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या  विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्‌घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात देशाने कोविड प्रतिबंधक लसीच्या 100 मात्रा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने, गंगामातेच्या अतुल्य गौरवाने, काशी निवासी लोकांच्या अतूट विश्वासाने, सर्वांसाठी मोफत लस पुरविण्याचे हे अभियान यशस्वीपणे प्रगती करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

स्वातंत्र्योत्तर भारतात, दीर्घ काळापर्यंत आरोग्य सुविधांकडे द्यायला हवे तसे लक्ष दिले गेले नाही आणि त्याकाळी नागरिकांना योग्य उपचारांसाठी धावपळ करावी लागल्यामुळे रुग्णाची परिस्थिती आणि आर्थिक ताण अधिकच वाढत जात असे याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचारांबाबत मध्यम वर्ग आणि गरीब वर्गातील लोकांच्या मनात सतत चिंता भरून राही. आपल्या देशात ज्यांची सरकारे दीर्घकाळ सत्तेत होती त्या राज्यकर्त्यांनी देशाच्या आरोग्य यंत्रणेचा सर्वंकष विकास साधण्याऐवजी, या क्षेत्राला सुविधांपासून वंचित ठेवले.

मित्रांनो

7 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये जे  सरकार होते आणि  4 वर्षांपूर्वी इथे उत्तर प्रदेशात जे सरकार होते , ते  पूर्वांचलमध्ये काय करत होते? जे आधी सरकारमध्ये होते ते मतांसाठी कुठेतरी एखादा दवाखाना किंवा एखाद्या छोट्या रुग्णालयाची घोषणा करून गप्प बसायचे. लोक देखील आशेने वाट पाहत बसायचे, मात्र वर्षानुवर्षे  इमारत बांधली जात नव्हती,  किंवा इमारत असेल तर  यंत्रसामुग्री नाही, या दोन्ही गोष्टी आहेत तर  डॉक्टर आणि इतर कर्मचारी नाहीत . आणि याशिवाय गरीबांकडून हजारो कोटी रुपये लुटणारे  भ्रष्टाचाराचे चक्र  अहोरात्र सतत चालत होते. औषधांमध्ये  भ्रष्टाचार, रुग्णवाहिकांमध्ये  भ्रष्टाचार, नियुक्तिमध्ये  भ्रष्टाचार,  बदल्या -पोस्टिंग मध्ये भ्रष्टाचार ! या संपूर्ण खेळात उत्तर प्रदेशात  काही घराणेशाही समर्थकांचे मात्र भले झाले. भ्रष्टाचाराचे चक्र खूप चालले, मात्र त्यात पूर्वांचल आणि उत्तर प्रदेशचा सामान्य माणूस भरडला गेला.

योग्य म्हटले आहे –

‘जाके पाँव न फटी बिवाई, वो क्या जाने पीर पराई’

मित्रांनो

गेल्या काही वर्षात डबल इंजिनच्या सरकारने प्रत्येक गरीबापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले,  निरंतर काम केले आहे. आम्ही देशात नवीन आरोग्य धोरण लागू केले जेणेकरून गरीबाला स्वस्तात उपचार मिळतील आणि त्याला आजरांपासूनही वाचवता येईल. इथे उत्तर प्रदेशात देखील 90 लाख रुग्णांना  आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार मिळत आहेत.  आयुष्मान भारतमुळे या गरीबांचे सुमारे  एक हजार कोटी रुपये उपचारांसाठी खर्च होण्यापासून वाचले आहेत. आज हजारो जन औषधि केंद्रांमधून अतिशय स्वस्त दरात औषधे मिळत आहेत.  कर्करोगावर उपचार, डायलिसिस आणि हृदयावरील शस्त्रक्रिया खूप स्वस्त झाली आहे, शौचालय सारख्या सुविधांमुळे अनेक आजार कमी झाले आहेत. एवढेच नाही तर देशभरात उत्तम रुग्णालये कशी उभी राहतील आणि त्या रुग्णालयांमध्ये उत्तम डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय  कर्मचारी कसे  उपलब्ध होतील, यासाठी खूप व्यापक आणि दूरदृष्टीसह काम केले जात आहे. आता रुग्णालयांचे, वैद्यकीय महाविद्यालयांचे  भूमिपूजन देखील होते आणि त्यांचे ठरलेल्या वेळी  लोकार्पण देखील पार पडते.  योगीजी यांच्या सरकारपूर्वी जे सरकार होते, त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात केवळ 6 वैद्यकीय महाविद्यालये बांधली. योगीजी यांच्या कार्यकाळात  16 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत आणि   30 नव्या  वैद्यकीय महाविद्यालयांचे काम वेगाने सुरु आहे.  रायबरेली आणि गोरखपुर इथे बनत  असलेले  एम्स तर उत्तर प्रदेशासाठी एक प्रकारे बोनस आहे.

बंधू आणि भगिनींनो,

वैद्यकीय महाविद्यालये केवळ उत्तम उपचार देत नाहीत तर नवीन  डॉक्टर्स, नवीन निम वैद्यकीय  कर्मचारी देखील तयार करतात. जेव्हा वैद्यकीय महाविद्यालय उभे राहते तेव्हा तिथे विशिष्ट प्रकारचे प्रयोगशाळा प्रशिक्षण केंद्र , नर्सिंग विभाग, वैद्यकीय विभाग आणि  रोजगाराची अनेक नवी साधने बनतात. दुर्दैवाने पूर्वीच्या दशकांमध्ये देशातील डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी देशव्यापी धोरणावर काम झाले नाही. अनेक दशकांपूर्वी  वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षणाच्या देखरेखीसाठी जे  नियम कायदे बनवले गेले होते , ज्या संस्था निर्माण केल्या त्या जुन्या पद्धतीने चालत होत्या. ,नवीन  वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीत त्या अडथळा बनत होत्या.

मागील  7 एकामागोमाग एक  अशी प्रत्येक जुनी व्यवस्था बदलली जात आहे.,जी वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गात अडथळा बनत आहे. याचा परिणाम वैद्यकीय शिक्षणाच्या  जागांच्या संख्येवरही दिसून येतो. 2014 पूर्वी आपल्या देशात वैद्यकीय जागा 90,000 पेक्षा कमी होत्या. गेल्या 7 वर्षांत देशात 60,000 नवीन वैद्यकीय जागा यात जोडल्या गेल्या आहेत. इकडे उत्तर प्रदेशातही 2017 पर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 1900 वैद्यकीय जागा होत्या. मात्र  दुहेरी इंजिनच्या सरकारमध्ये गेल्या चार वर्षांत 1900 हून अधिक जागा वाढवण्यात आल्या  आहेत.

मित्रांनो ,

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढण्याचा, वैद्यकीय जागा वाढण्याचा  एक महत्वपूर्ण पैलू हा देखील आहे की इथले जास्तीत जास्त युवक  डॉक्टर बनतील. गरीब मातेच्या मुलाला आणि मुलीलाही  आता डॉक्टर बनणे सोपे जाईल. सरकारच्या  निरंतर प्रयत्नांचा  परिणाम आहे की स्वातंत्र्यानंतर, 70 वर्षांमध्ये जेवढे डॉक्टर शिकून तयार झाले त्यापेक्षा जास्त  डॉक्टर आपण पुढील 10-12 वर्षांमध्ये तयार करू शकू.

मित्रांनो

युवकांना देशभरात विविध प्रवेश परीक्षांच्या तणावापासून  मुक्ति देण्यासाठी एक देश, एक परीक्षा  लागू करण्यात  आले आहे. यामुळे खर्चाची देखील बचत होईल आणि आणि त्रास देखील कमी होईल. वैद्यकीय शिक्षण गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असावे यासाठी खासगी महाविद्यालयांचे  शुल्क नियंत्रित ठेवण्यासाठी कायदेशीर तरतूद देखील करण्यात आली आहे. स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण न झाल्यामुळे देखील अनेक अडचणी येतात. आता  हिंदी सह अनेक भारतीय भाषांमध्येही उत्तम वैद्यकीय शिक्षणाचा  पर्याय देण्यात आला आहे. आपल्या  मातृभाषेत जेव्हा युवक  शिकतील तेव्हा  आपल्या कामावर त्यांची मजबूत पकड असेल.

मित्रांनो,

आपल्या आरोग्य सुविधा उत्तर प्रदेश जलद गतीने सुधारू शकतो हे उत्तर प्रदेशच्या लोकांनी  या  कोरोना काळात  देखील सिद्ध केले आहे. चार दिवसांपूर्वीच भारताने  100 कोटी लसींच्या मात्रांचे मोठे लक्ष्य  साध्य केले आहे. आणि यात उत्तर प्रदेशचे मोठे  योगदान आहे. मी उत्तर प्रदेशची सगळी जनता , कोरोना योद्धे, , सरकार, प्रशासन आणि याच्याशी संबंधित  लोकांचे अभिनंदन करतो.  आज देशाकडे 100 कोटी लसींच्या मात्रांचे   सुरक्षा कवच आहे. आणि तरीही  कोरोना पासून बचावासाठी उत्तर प्रदेश तयारी करत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोनापासून वाचण्यासाठी मुलांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे आणि वेगाने काम सुरु आहे.   कोविड तपासणीसाठी आज उत्तर प्रदेशाकडे  60 पेक्षा अधिक प्रयोगशाळा आहेत. 500 हून अधिक नव्या ऑक्सिजन संयंत्रांवर देखील वेगाने काम सुरु आहे.

मित्रांनो ,

हाच तर  सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि  सबका प्रयास हाच तर त्याचा मार्ग आहे.  जेव्हा सगळे निरोगी असतील, जेव्हा सगळ्यांना संधी मिळेल. तेव्हा कुठे  सबका प्रयास देशाच्या उपयोगी येईल.  दीपावली आणि छठ चे  पर्व यावेळी  पूर्वांचलमध्ये आरोग्याचा नवा  विश्वास घेऊन आले आहे. हा  विश्वास, गतिमान विकासाचा आधार  बनवा या कामनेसह नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी संपूर्ण उत्तर प्रदेशला  पुन्हा शुभेच्छा आणि   धन्यवाद देतो. तुम्ही देखील एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला  आशीर्वाद  देण्यासाठी आलात त्यासाठी  मी तुमचे विशेष आभार मानतो, खूप-खूप  धन्यवाद।

पंतप्रधानांनी या उपायांच्या रोजगार क्षमतेवर प्रकाश टाकला आणि सांगितले की आरोग्यासोबतच पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे देखील आत्मनिर्भरतेचे एक माध्यम आहे. संपूर्ण आरोग्य सेवा मिळवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. याचा अर्थ आरोग्यसेवा जी सर्वांसाठी परवडणारी आणि सुलभ असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समग्र आरोग्यसेवा ही आरोग्याबरोबरच निरोगीपणावर लक्ष केंद्रित करते. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन अभियान, उज्ज्वला, पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष यासारख्या योजनांनी करोडो लोकांना रोगापासून वाचवले आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 2 कोटींहून अधिक गरीब लोकांना मोफत उपचार मिळाले आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाद्वारे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज केंद्रात आणि राज्यात गरीब, दलित, शोषित, मागासलेल्या आणि मध्यमवर्गीयांच्या वेदना समजून घेणारे सरकार आहे. “आम्ही देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशात ज्या वेगाने नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत त्याचा राज्यातील वैद्यकीय जागांवर आणि डॉक्टरांच्या संख्येवर मोठा परिणाम होईल. अधिक जागांमुळे आता गरीबांची मुलेही डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहू शकतील आणि ते पूर्ण करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

पवित्र शहर काशीच्या गतकाळातील रयाला गेलेल्या स्थितीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शहराच्या पायाभूत सुविधांच्या दयनीय स्थितीमुळे लोकांना शहर सोडावे लागत होते. परिस्थिती बदलली आणि आज काशीचा आत्मा तोच, मन तेच आहे, पण काया सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, “वाराणसीमध्ये गेल्या 7 वर्षात जे काम केले गेले ते गेल्या अनेक दशकांत झाले नाही.”

बनारस हिंदू विद्यापीठाने जागतिक उत्कृष्टतेच्या दिशेने केलेली प्रगती ही गेल्या काही वर्षांमधील काशीच्या महत्त्वाच्या कामगिरीपैकी एक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज, बनारस हिंदू विद्यापीठात तंत्रज्ञानापासून आरोग्यापर्यंत, अभूतपूर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. देशभरातील तरुण वर्ग इथे अभ्यासासाठी येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वाराणसीमध्ये गेल्या 5 वर्षांत उत्पादनात 60 टक्के वाढ आणि खादी आणि इतर कुटीर उद्योग उत्पादनांच्या विक्रीत 90 टक्के वाढ झाल्याबद्दल प्रशंसा करून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशवासियांना स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आणि ‘व्होकल फॉर लोकल’ चे आवाहन केले. ते म्हणाले की, स्थानिक म्हणजे फक्त दिव्यांसारखी काही उत्पादने नव्हे तर देशवासियांच्या मेहनतीचे चीज म्हणून कोणत्याही उत्पादनाला सणासुदीच्या काळात सर्व देशवासीयांच्या प्रोत्साहनाची आणि कायमस्वरूपी ग्राहक जोडण्याची गरज असते.

 

JPS/MC/SRT/SC/RA/VJ/PM

 

 

 

JPS/MC/SRT/SC/RA/VJ/PM

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com